राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे पटेलांच्या हस्ते उद्घाटन

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते राजधानी पणजीत उद्घाटन करण्यात आले.

पणजी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते राजधानी पणजीत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार चर्चिल आलेमाव, माजी आमदार तथा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यातील नवीन इनिंग सुरु करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी पटेल यांनी गोव्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या .

संबंधित बातम्या