माजी आमदार किरण कांदोळकर यांची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

क्राईम ब्रँचने घातलेल्या फ्लॅटवरील छाप्यावेळी त्यांच्या नावाचे काही दस्तावेज सापडले होते. त्यामुळे त्यांना समन्स पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यास क्राईम ब्रँचने सांगितले होते. ते चौकशीसाठी रायबंदर येथील क्राईम ब्रँच विभागात उपस्थित राहिले. 

म्हापसा- येथील मटका जुगार अड्ड्यावरील कारवाईप्रकरणी भाजपचे बंडखोर नेते किरण कांदोळकर हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचसमोर चौकशीसाठी आज हजर राहिले. क्राईम ब्रँचने घातलेल्या फ्लॅटवरील छाप्यावेळी त्यांच्या नावाचे काही दस्तावेज सापडले होते. त्यामुळे त्यांना समन्स पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यास क्राईम ब्रँचने सांगितले होते. ते चौकशीसाठी रायबंदर येथील क्राईम ब्रँच विभागात उपस्थित राहिले. 

भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर म्हणाले की, गेल्या काही महिन्यापासून भाजप सरकारच्या कार्यपद्धतीबाबत टीका करत असल्याने राजकारण्याच्या दुश्‍मनीतून मला लक्ष्य बनविले जात आहे. पोलिसांचा वापर करून सूड उगवला जात असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली.

संबंधित बातम्या