'हिम्मत असेल तर समोर येऊन आजगावकरांनी आरोप करावे'

ज्या मतदारांनी 16 हजार मतांनी बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांचा 2012 च्या निवडणुकीत पराभव केला होता त्याची पुनरावृत्ती 2022 च्या निवडणुकीत होणार आहे.
Parashuram Kotkar
Parashuram KotkarDainik Gomantak

मोरजी: उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) हे वैफाल्ग्रस्त झाले आहेत, त्याना कोणताही मगो पक्षाच्या उमेदवारावर आरोप आणि टीका करण्याचा अधिकार नाही, ज्या मतदारांनी 16 हजार मतांनी बाबू आजगावकर यांचा 2012 च्या निवडणुकीत पराभव केला होता त्याची पुनरावृत्ती 2022 च्या निवडणुकीत होणार आहे. त्यांना हिम्मत असेल तर मगोच्या कार्यकर्त्यासमवेत एकाच व्यासपीठावर येवून आरोप करावे आम्ही एकाच व्यासपीठावर येवून चर्चा करायला आणि आरोपाचे खंडन करायला तयार आहोत असे प्रति आव्हान माजी आमदार परशुराम कोटकर (Parashuram Kotkar) यांनी धारगळ येथे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी 7 रोजी धारेश्वर मंदिर आणि माऊली मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचार केला त्यावेळी परशुराम कोटकर बोलत होते.

यावेळी मगोचे नेते प्रवीण आर्लेकर, माजी जिल्हा सदस्य तुकारम हरमलकर, कोरगाव माजी सरपंच सुदीप कोरगावकर, वझरी माजी सरपंच संगीता गावकर , प्रवक्ते उमेश तळवणेकर, आवेलीन रोद्रीगीस, जयेश पालयेकर, उपसरपंच सुबोध महाले, उदय महाले, वकील मुरारी परब, व मोठ्या संखेने समर्थक उपस्थित होते. मागच्या महिन्यात मगोचे प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथे प्रचाराचा शुभारंभ करताना शक्ती प्रदर्शन केले होते आता दुसऱ्यादा धारगळ येथे करण्यात आले.

Parashuram Kotkar
"सध्या तरी मी गोवा फॉरवर्ड पक्षाचाच"

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे हल्ली प्रत्येक कार्यक्रमात विरोधी उमेदवार हे ड्रग्स व्यवसायात आहेत आणि दुसरा लोकाना टोपी घालणारा अशी टीका केली जात आहे, त्या उमेद्वारापासून जनतेने सावध राहावे असे आवाहन आजगावकर करत आहे. त्याला उत्तर देताना माजी आमदार परशुराम कोटकर यांनी पुढे बोलताना जर हिम्मत असेल तर पुरावे आणि नावे जाहीर करा, शिवाय मगोच्या कार्यकर्त्यासमवेत एकाच व्यासपीठावर येवून चर्चा करण्याचे प्रतिआव्हान कोटकर यांनी आजगावकर याना दिले. मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना आपण भाषणे करण्याऐवजी कृती करणार, निवडणुका पूर्वा जेवढी लोकांची कामे शक्य आहे तेवढी करणार आणि उर्वरित आमदार झाल्यानंतर करणार अशी ग्वाही देवून मतदारांनी एकदा आपल्याला संधी देवून कामे करून घ्यावीत असे आवाहन केले.

जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर यांनी बोलताना हीच योग्य वेळ आहे बाबू आजगावकर याना घरी पोचवण्याची, लोकांचा सूड घेणारा आमदार आम्हाला नको आहे, जनतेच्या सहवासात आणि मतदार संघात २४ तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला हवा आहे आणि तो आमदार प्रवीण आर्लेकर असेल असा दावा केला. वकील मुरारी परब यांनी बोलताना जसा बाबू आजगावकर यांचा राजेंद्र आर्लेकर यांनी पराभव केला होता त्याच पद्धतीने आता मगोचे प्रवीण आर्लेकर करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला .

यावेळी संगीता गावकर यांनी बोलताना महिला शक्ती मगोच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे, महिलांनी आपला नेता निवडलेला आहे, त्यामुळे विरोधकांनी आम्हा सावध राहण्याची सांगायची गरज नाही. उमेश तळवणेकर यांनी आवेलीन रोद्र्गीस यांनी बाबू आजगावकर यांच्यावर टीका केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com