पणजीचे माजी महापौर उदय मडकईकरांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी पुष्पगुच्छ देऊन मडकईकर यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
पणजीचे माजी महापौर उदय मडकईकरांनी   काँग्रेसमध्ये केला प्रवेश
Uday MadakaikarDainik Gomantak

पणजी: पणजी महापालिकेचे (Panajim Municipal Corporation) माजी महापौर व विद्यमान जेष्ठ नगरसेवक उदय मडकईकर (Uday Madakaikar) यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन मडकईकर यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक राहुल लोटलीकर व इतर कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Uday Madakaikar
Goa Municipal Election 2021: म्हापसा पालिका निवडणूकीतील विजयी उमेदवारांची यादी जाहीर

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे खंदे समर्थक असलेले उदय मडकईकर हे पणजीतील पणजीतून काँग्रेसच्या उमेदवारीवर लढण्यास इच्छुक असून बाबूश मोन्सेरात यांचे एक खंदे समर्थक टोनी रॉड्रिग्ज यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असून ते ताळगावितून काँग्रेसच्या उमेदवारीवर लढण्यास इच्छुक आहेत. या प्रसंगी बोलताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले की पणजी व ताळगाव येथील लोक क्रांती करण्यास उत्सुक झालेला आहेत. येत्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार आहेत. मोन्सेरात कुटुंबीयांच्या फॅमिली राजला यावेळी जबरदस्त दणका बसणार आहे.

Uday Madakaikar
Goa Election 2022: मांद्रेत कॉंग्रेसच्या ३ उमेदवारांची तिकिटासाठी चढाओढ

चोडणकर म्हणाले, तर बाबूश मोन्सेरात यांनी पणजी साठी काही केले नाही ते निष्क्रिय आमदार आहेत. अशी टीका उदय मडकईकर यांनी केली. गेली बावीस वर्षे आपण त्यांच्यासोबत होतो . मात्र कोणालाही विश्वासात न घेता त्यानीअनेक पक्ष बदलले. यावेळी मात्र पणजी व ताळगावातून फॅमिली राज्य आम्ही संपवणार असल्याचे उदय मडकईकर यांनी सांगितले. त्या दहा आमदारांना पक्षश्रेष्ठींनी प्रवेश देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केल्याचे दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी यावेळी बोलताना सांगितले .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com