पणजीचे माजी नगराध्यक्ष बाबन नाईक यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

काही दिवसांपूर्वी त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल केले होते. त्यांना काही चाचण्या करण्यासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल केले असता हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले.

पणजी: पणजीचे माजी नगराध्यक्ष व माजी आमदार बाबन नाईक (७६ वर्षे) यांचे हृदयविकाराने आज दुपारी निधन झाले. त्यांच्यावर आज संध्याकाळी ६.३० वा. सांतिनेज येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी पणजीचे महापौर उदय मडकईकर, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप तसेच इतर काही महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. 

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून त्यांनी राजकारणाची कारकिर्द सुरू केली. ते १९७२ साली मगोच्या तिकिटावर पणजीचे आमदार म्हणून निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल केले होते. त्यांना काही चाचण्या करण्यासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल केले असता हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या