गोव्यातील माजी पोलिस उपनिरिक्षक गुडलरविरूद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

दहा वर्षांपूर्वी राज्यात पोलिस - ड्रग्ज माफिया लागेबांधे प्रकरण गाजले होते. या प्रकरणाच्या चौकशीत संशयावरून पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तक्रार दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी सुरू केली.

पणजी : दहा वर्षांपूर्वी राज्यात पोलिस - ड्रग्ज माफिया लागेबांधे प्रकरण गाजले होते. या प्रकरणाच्या चौकशीत संशयावरून पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तक्रार दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी सुरू केली. या चौकशीत त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक रक्कम सापडल्याने विभागाने पणजी विशेष न्यायालयात त्याच्यावर व त्याच्या आईविरुद्ध आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रावर येत्या २५ नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आल्‍याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्याविरुद्ध सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा लाखोची रक्कम अधिक असल्याचे चौकशीत उघड झाले होते व त्यासंदर्भात त्याने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नव्हते. बँक खात्यावर मोठ्या रक्कमा जमा केलेल्या असल्याचे बँकेकडून घेतलेल्या माहितीत आढळून आले आहे. 
 

अधिक वाचा : 

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार ; मुख्यमंत्री राहणार उपस्थित

गोव्यातील नोकरभरतीचा मार्ग अखेर खुला 

गोव्याच्या माजी पर्यटनमंत्र्यांचा काँग्रेसच्या दिशेने कल

 

संबंधित बातम्या