राजीव गांधी यांच्यामुळेच युवा वर्गाला मतदानाचा अधिकार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

राजीव गांधी यांच्यामुळेच युवा वर्गाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला, त्यामुळे देशाच्या राजकारणात युवकांचा सहभाग महत्त्वाचा ठरला असल्याचे जॉन परेरा म्हणाले.

फोंडा: भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतींना फोंड्यात उजाळा देण्यात आला. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज (गुरुवारी) खडपाबांध - फोंड्यातील आमदार रवी नाईक यांच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या आठवणींना कॉंग्रेस सदस्यांनी उजाळा दिला. यावेळीर रवी नाईक यांच्या सभागृहात पाळण्यात आली. यावेळी गट कॉंगेसचे अध्यक्ष अरुण गुडेकर, कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य जॉन परेरा, अशोक नाईक, शेख शब्बीर, किशोर नाईक, रसिक पारकर, प्रशांत माईणकर, तातो नाईक, अचला गावस व इतर सदस्य उपस्थित होते. 

जॉन परेरा यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच इतर कॉंग्रेस सदस्यांनी पुष्पांजली अर्पण करून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी राजीव गांधी यांच्या आठवणींना वक्‍यांनी उजाळा दिला. 

राजीव गांधी यांच्यामुळेच युवा वर्गाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला, त्यामुळे देशाच्या राजकारणात युवकांचा सहभाग महत्त्वाचा ठरला असल्याचे जॉन परेरा म्हणाले. सूत्रसंचालन अरुण गुडेकर यांनी केले. अचल गावस यांनी आभार मानले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या