Goa Politics: माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा नव्याने सरकारवर हल्लाबोल

चोडणकर : साल्वादोर दु मुंद येथील जमीन हडप प्रकरण
Congress Demands Enquiry
Congress Demands Enquiry Dainik Gomantak

पणजी: डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाची वाटचाल भक्कमपणे सुरू असतानाच कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नव्याने हल्लाबोल करत साल्वादोर दु मुंद येथील जमीन हडप करणाऱ्या ‘त्या’ मंत्र्याचे नाव घोषित करून मंत्रिमंडळातून त्याची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

(Former state president Girish Chodankar alleges against the government)

Congress Demands Enquiry
Fir In Goa|हळदोणा येथे वळवईकर यांच्या घरात अग्नितांडव गाड्यांचे मोठे नुकसान

मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यावर कारवाई करावी किंवा मंत्रिमंडळातील कोणीही जमीन हडप केलेली नाही, असे जाहीर करावे, असे आव्हान चोडणकर यांनी दिले होते. त्याचाच हा पुढचा भाग आहे. 2022 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गिरीश चोडणकर यांनी माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन करून टप्प्या टप्प्याने या प्रकरणाची माहिती उघड केली होती. अखेर पोलिस स्थानकामध्ये नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ही केस सुरू असली, तरी नाईक यांना विधानसभा निवडणुकीत लोकांनी झिडकारले. आता तीच खेळी चोडणकर यांच्याकडून नव्याने खेळली जात असून मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर त्यांना रोख कायम आहे. राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप केलेल्या प्रकरणांची चौकशी एसआयटीमार्फत सुरू आहे. हे प्रकरण यापूर्वीच दक्षता विभागाकडे सुपूर्द केले असून त्यांनी ते एसआयटीकडे द्यावे. त्यामुळे इतर प्रकरणांपेक्षा प्राधान्यक्रमाने हे प्रकरण घेऊन या मंत्र्यावर कारवाई करावी. कारण हा मंत्री अशा अनेक प्रकरणांचा मास्टरमाईंड आहे.

पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार

यासंदर्भात 20 जुलै 2022 रोजी जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी असलेली सेलडीड फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी आपल्या तक्रारीसह पर्वरी पोलिस ठाण्यात दिली आहे. दक्षता विभाग आणि पंचायतीमध्येही तक्रार करण्यात आली आहे. यावर अद्याप कारवाई केलेली नाही. दबावापोटीच हे प्रकरण दडपण्याचा हा प्रकार आहे. गोमंतकीयांच्या जमिनी बळकावून या जागेवर मुंबईतील व्यावसायिकांनी बांधकाम सुरू केले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.

एसआयटीकडे तक्रार नोंदवणार : ॲन्थनी मॅन्युएल रिबेलो आणि श्रीमती हेजल सेवेरिनो मेन्डोन्सा यांच्या मालकीच्या 3150 चौरस मीटर जागेची तक्रार असून सर्व्हे क्रमांक 221/25हा जमिनीचा संदर्भ आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आपण एसआयटीकडे नवी तक्रार दाखल करू आणि लवकरच दुसरे प्रकरण उघड करू, असे चोडणकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com