गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय माजी मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचं गोव्यात निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय व निष्ठावंत माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचं  बुधवारी गोव्यात अल्पशा आजाराने निधन झालं.

पणजी : गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय व निष्ठावंत माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचं  बुधवारी गोव्यात अल्पशा आजाराने निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. कॅप्टन सतीश शर्मा कर्करोगाने ग्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. गोव्यात सायंकाळी 8:16 वाजता त्यांचं निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार शुक्रवारी दिल्लीत केले जातील अशी माहिती त्यांचा मुलगा समीरने दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय असलेले कॅप्टन सतीश शर्मा यांनी 1993 ते 1996 पर्यंत नरसिंह राव सरकारमध्ये केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री म्हणून काम केलं होतं.

गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दाखवणार पेडणेवासीय जागा

आंध्र प्रदेशच्या सिकंदराबाद येथे 11 ऑक्टोबर 1947 रोजी जन्मलेले  कॅप्टन सतीश शर्मा पेशाने पायलट होते.रायबरेली आणि अमेठी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे व लोकसभेचे तीन वेळा खासदार असलेले कॅप्टन सतीश शर्मा हे तीन वेळा मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचंदेखील प्रतिनिधित्व केलं होतं. ते प्रथम जून 1986 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले आणि नंतर राजीव गांधी यांच्या निधनानंतर 1991 मध्ये अमेठी येथून लोकसभेवर निवडून गेले.

पिळगांव पंचायतीचा गोवा फॉरवर्ड पक्षावर विश्वास

त्यानंतर जुलै 2004 ते 2016 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. कॅप्टन सतीश शर्मा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांच्या निधनाबद्दल मनापासून दु: ख झाले. कॅप्टन शर्मा यांनी नेहमीच समर्पण व निष्ठेने काम केलं. मी कुटुंब आणि मित्रांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो."

संबंधित बातम्या