टाळेबंदीतील ४४ कैदी अजूनही पॅरोलवर

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर कारागृहामध्ये कैद्यांची गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या ४४ मध्ये ४० पुरुष व ४ महिला कैद्यांचा समावेश आहे.

पणजी, 

राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा भोगत असलेल्या ४४ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते ते अजूनपर्यंत कारागृहाबाहेर आहेत. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर कारागृहामध्ये कैद्यांची गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या ४४ मध्ये ४० पुरुष व ४ महिला कैद्यांचा समावेश आहे.
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये टाळेबंदीपूर्वी सुमारे ४८६ कैदी होती. त्यामध्ये ३८९ कच्चे कैदी होते त्यामध्ये ३६४ पुरुष व २५ महिलांचा समावेश होता. या कारागृहामध्ये कमी व दिर्घकालिन शिक्षा भोगत असलेल्यांमध्ये ९७ जणांचा समावेश आहे त्यामध्ये ९३ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. ज्या कैद्यांना पॅरोलव सोडण्यात आले आहे ती कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरती सूट आहे. जोपर्यंत टाळेबंदी संपत नाही तोपर्यंत त्यांना कारागृहाबाहेर राहण्याची मुभा आहे. जे स्थानिक आहे त्यांना घरी राहण्यास तसेच पोलिस स्थानकावर हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे तर जे कैदी बिगर गोमंतकीय आहेत व त्यांना टाळेबंदीमुळे घरा जाऊ शकत नाहीत त्यांची खासगी निवासीमध्ये सोय करण्यात आली आहे.
कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर कोरोना विषाणू साथीपासून सुरक्षित राहण्यासाठी सामाजिक अंतर हे सक्तीचे करण्यात आल्याने या कोलवाळ कारागृहातील कैद्यांची तसेच कच्चे कैद्यांची संख्या जास्त असल्याने सामाजिक अंतर ठेवणे शक्य नव्हते. त्याचा काळात सर्वोच्च न्यायालयानेही सर्व राज्यांना उच्चस्तरीय समिती स्थापन करून कैद्यांना पॅरोल देण्यासंदर्भातच्या किंवा अंतरिम जामीन देण्याच्या तसेच सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या कच्च्या कैद्यांबाबत योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैद्यांना ठेवणे कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर गंभीर आहे असे निरीक्षण केले होते. त्यामुळे आवश्‍यक ती मार्गदर्शक तत्वे अंमलात आणून या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आल्याची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या