Goa Politics: "उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी राजीनामा द्यावा"

babu ajgaonkar.jpg
babu ajgaonkar.jpg

पणजी: पेडण्यातील नियोजित मोप विमानतळाच्या बांधकामामुळे त्या परिसरातील शेतांमध्ये माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील लोकांचे प्रश्‍न सोडविण्यास स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अथवा या अकार्यक्षम आमदाराला मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. (Forward Party has demanded the resignation of Deputy Chief Minister Babu Azgaonkar)

पणजीत पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले की, दोन आठवड्यांपूर्वी पेडणे भाजप मंडळ अध्यक्षांनी मोप विमानतळाच्या बांधकामामुळे शेतात गेलेल्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी निवेदन सादर केले होते. विजेच्या समस्यासंदर्भात पेडण्यातील साहाय्यक अभियंत्याच्या कार्यालयात मंडळ अध्यक्षांनी विचारणा केली होती. यावरून पेडण्याचे आमदार अकार्यक्षम बनल्याने मंडळ अध्यक्षांना कामे करावी लागत आहेत. स्थानिक आमदार लोकांचे प्रश्‍न सोडविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पेडण्यासाठी ते आपत्ती ठरत आहेत. 

...तर जनविरोधी वातावरण का?

मोप विमानतळ पेडण्यामध्ये खेचून आणला, असे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सांगत आहेत. मतदारांनी निवडून दिले म्हणूनच त्यांना शक्य झाले, हे त्यांनी लक्षात ठेवावे. ते समस्या सोडविण्यास अपयशी ठरल्यानेच स्थानिकांना, ट्रक व्यावसायिकांना आपल्‍या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते. हा प्रकल्प लोकांच्या विकासासाठी आहे, तर रस्त्यावर येण्याची पाळी का येत आहे, याचे उत्तर आमदार आजगावकर यांनी लोकांना द्यायला हवे. जीएमआर व हवाईवाहतूक खाते अपयशी ठरले आहे.

‘बाबू व बाबा’ कोविडयोद्ध्यांना विसरले? 

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व आरोग्यमंत्री ‘बाबा’ राणेंनी केपे येथील कोविड निगा केंद्रातील कोविडयोद्ध्यांचा सन्मान केला. गेले सोळा महिने कोविड तपासणी, कोविड निगा व लस टोचणी कार्यात सतत कार्यरत असलेल्‍या बाळ्ळी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र ‘बाबू व बाबा’ विसरले. आठवड्याची सुटी व इतर सुट्यांवर पाणी सोडून कोविड महामारीविरुद्ध लढा देणारे हे आरोग्य अधिकारी व कर्मचारी स्वत:लाच विचारू लागले आहेत, ‘हेची फळ काय मम तपाला..!’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com