सरदेसाईंकडून पार्किंग प्लाझाची प्रतिकात्मक पायाभरणी

कामत यांनी युकेतून फोन केल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप
Foundation Stone for Development of Parking Plaza
Foundation Stone for Development of Parking Plaza Dainik Gomantak

कदंब बस स्थानकाजवळ आठ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पार्किंग प्लाझा प्रकल्पाची पायाभरणी आज शेवटच्या क्षणी सरकारने रद्द केली. त्यामुळे संतप्त होत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी लोकांच्या साहाय्याने प्रतिकात्मक पायाभरणी सोहळा पार पाडला.

आज हा कार्यक्रम करण्याचे ठरले होते. पण रात्री ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द केल्याचा मेल सरदेसाई यांना नगर विकास खात्याकडून आला. यावर सरदेसाई यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर आरोप करताना, सध्या युकेमध्ये विश्रांती घेणाऱ्या कामत यांनी नगर विकासमंत्री विश्‍वजीत राणे यांना फोन करून हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले.

Foundation Stone for Development of Parking Plaza
...तर हेलिकॉप्टरने आग विझविणार : विश्‍वजीत राणे

कामत आणखी महिनाभर विदेशात राहणार आहेत. तोपर्यंत येथील सगळी कामे स्थगित ठेवायची का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो, मडगावचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर, माजी नगरसेवक केतन कुरतरकर, समाजसेवक जूझे मारिय मिरांडा,माजी नगराध्यक्ष बबिता आंगले आदी हजर होते.

विकासाच्या आड येऊ नका

दिगंबर कामत 30 वर्षे मडगावचे आमदार आहेत. पण मडगाव येथे त्यांना तीन जागा उपलब्ध असतानाही पार्किंग प्लाझा उभारता आलेला नाही. मात्र, फातोर्डा येथे जर पार्किंग प्लाझा उभा राहत असेल तर त्याचे उद्‍घाटन त्यांच्या हजेरीत का व्हायला पाहिजे? असा सवाल सरदेसाईने केला.

युकेतून फोन करुन कामे करून घ्यायची असल्यास त्यांनी पालिका सफाई कामगारांना अजून जो पगार दिलेला नाही, त्याची फोनवरून तरतूद करावी, असे सांगून फातोर्डा येथील विकास कुणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com