काणकोणात आज कृषी भवनाची पायाभरणी

The foundation stone of Krishi Bhavan was laid in Kankon today
The foundation stone of Krishi Bhavan was laid in Kankon today

काणकोण : काणकोण भाजप मंडळातर्फे शुक्रवारी (ता.३०) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा शुक्रवारी काणकोणात सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्रीस्थळ पंचायत सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. ३ कोटी ६८ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या कृषी भवनाच्या पाया भरणीसाठी काणकोणात येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता पायाभरणी समारंभ होणार आहे. त्यापूर्वी श्रीस्थळ पंचायत सभागृहात सत्कार सोहळा होईल, अशी माहिती उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, दक्षिण गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनुजा नाईक गावकर, महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य तन्वी कोमरपंत, सदस्य चंदा देसाई या उपस्थित होत्या. सत्कार सोहळ्याला आदिवासी कल्याण कमिशनचे अध्यक्ष माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत, नगराध्यक्षा नीतू देसाई हे उपस्थित राहतील.

मुख्‍यमंत्र्यांकडून सहकार्य
काणकोण मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भरीव मदत केली आहे. गुळे ते पोळे महामार्गाच्या डांबरीकरण १२ कोटी रुपये खर्चून येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. पालिका भवन, रवींद्र भवनची इमारत येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. याशिवाय अनेक विकासकामे मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने काणकोणात राबविण्यात आली आहेत. पावणेचार कोटी रूपये खर्चून काणकोणा कृषी भवन उभे करण्यात येणार आहे. १९९६ मध्ये कृषी खात्याने ७ हजार चौरस मीटर जमीन संपादित केली होती. २४ वर्षांनी कृषी भवनाचे स्वप्न साकारत आहे. मुख्यमंत्र्याचे काणकोणमधील जनतेवर प्रेम आहे तेच त्यांच्यावरील प्रेम दाखवण्याची काणकोणवासीयांचे दायित्व आहे. त्यासाठी भाजप मंडळाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे उपसभापतींनी सांगितले.

असे असेल कृषी भवन
कृषी भवन तळमजल्यासहीत तीन मजली राहणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. कृषी भवनात स्थानिक कृषी उत्पादकांना मालाची विक्री करण्यासाठी खास दालन निर्माण करण्यात येणार आहे. त्याशिवाय येथील वैदूनाही जागा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनुजा नाईक गावकर यांनी समाज कल्याण योजनाच्या लाभधारकांना उत्पन्नाचा दाखला व अन्य दाखले कोरोना महामारीच्या काळात देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कांदा महाग झाल्याने शिधा पत्रिकाधारकांना शिधापत्रिकेवर दरमहा ३२ रुपये किलो दराने तीन किलो कांदे देण्याची योजना जाहीर करून गृहणीना दिलासा दिला आहे, त्यामुळे ते अभिनंदनास पात्र असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री आज 
दिवसभर काणकोणात

मुख्यमंत्री शुक्रवारी दिवसभर काणकोणात राहून सरकारी व खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी कृषी भवनाची पायाभरणी व सत्कार सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीत नव्यानेच सुरू होणाऱ्या अद्ययावत अशा पोहा मिलचे उद्‍घाटन करणार आहेत. महामाया फूड प्रॉडक्टस या अस्थापनाने हे पोहा मिल सुरू केले आहे. दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्र्याहस्ते हे उद्‍घाटन होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवाबाग येथील पिझ्झा सेंटरचे उद्‍घाटन करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com