राज्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

राज्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आज मृत्यू झाले. यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६३० वर पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १७२ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली,

पणजी : राज्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आज मृत्यू झाले. यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६३० वर पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १७२ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली, तर २३८ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात दोन हजार पासष्ट इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. आज मृत्यू झालेल्यांमध्ये म्हापसा येथील ७७ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ६५ वर्षीय महिला, कुडचडे येथील ६६ वर्षीय पुरुष आणि फातोर्डा येथील ८८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १५८६ जणांच्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या, तर १०४ लोकांनी उपचारासाठी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला. ३२ जण इस्पितळात भरती झाले. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९३.९५ टक्के इतका आहे. उत्तर गोव्यात १७९ खाटा, तर दक्षिण गोव्यात १९१ खाटा शिल्लक आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात ४३ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ६८ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात १३५ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ९५ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात १२० रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १६७ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात १०९ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १३३ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ५१ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

संबंधित बातम्या