वास्कोत दोन्ही डोस घेतलेले चार कर्मचारी कोरोना बाधित

निवडणुकीच्या काळात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक आयोगासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे
Vasco Corona infected
Vasco Corona infected Dainik gomantak

वास्कोतील मामलेदार कचेरीत दोन्ही डोस घेतलेले चार कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने इतर कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीच्या काळात कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक आयोगासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

गोव्यात कोविडची (covid-19) तिसरी लाट फैलावत असून दर दिवशी कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपल्याने निवडणूक आयोगासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कारण बाधितांच्या संख्येत नागरिकांबरोबर शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी बाधित झाले आहेत.

Vasco Corona infected
निवडणुकीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना 'डोअर स्टेप' ची सुविधा

निवडणूक काळात शासकीय (govt) तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच पोलिस कर्मचारी निवडणूक कामकाजात व्यस्त असून प्रत्येकाला निवडणुकीचे कामकाज वाटून देण्यात आलेले आहे. त्यानुसार सकाळ ते संध्याकाळी सदर कर्मचारी वर्ग आपल्या निवडणूक कामात व्यस्त असतात जर एखादा कर्मचारी आजारी पडला तर त्याच्या कामावर मोठा परिणाम पडतो. त्याच्या जागेवर काम करणाऱ्यांना दोन दोन कामे हाताळावी लागतात.

दरम्यान, वास्कोतील मामलेदार कार्यालयातील चार कर्मचारी ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत ते कोविडबाधित आढळल्याने येथील अधिकारी वर्गावर पेज प्रसंग निर्माण झाला आहे. कारण एकाच वेळी चार कर्मचारी कोविडबाधित आढळल्याने कामकाजावर परिणाम तर झालाच आहे उलट येथील इतर कर्मचाऱ्यावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

Vasco Corona infected
गोव्यात गेल्या 24 तासात 3145 कोविड रुग्ण, पॉझिटिव्ह दर 39.1% वर

दोन दिवसापूर्वी येथील एक कर्मचारी आजारी होता. मात्र तो कार्यालयात काम करत होता. नंतर तो कोविड बाधित आढळल्याने सर्व कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत होते. नंतर आता आणखी तीन कर्मचारी कोविडबाधित आढळल्याने उर्वरित कर्मचारी भीतीच्या छायेखाली कामकाज हाताळत आहे.

दरम्यान आज मामलेदार कार्यालयात सेनिटायझ करून घेण्यात आले. यावेळी सगळे कर्मचारी भयभीत होऊन बाहेर उभे राहिले होते. दरम्यान वाढती संख्या आणि निवडणूक (Election) डोळ्यासमोर ठेवली तर निवडणूक आयोगासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे कोरोनाच्या सावटाखाली आगामी विधानसभा निवडणुका (Assembly Election) पार पाडण्याचे आव्हान आयोगासमोर असून त्यानुसार निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com