Four lakh assistance to the families of those killed in the storm
Four lakh assistance to the families of those killed in the storm

Cyclone Tauktae Impact: गोव्यातील तौक्ते वादळातील मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत

पणजी: मागच्या काही दिवसांत हे वादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर देशाच्या अनेक राज्यांत मोठं नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले होते. अरबी समुद्रात (arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ (Cyclone) निर्माण झाले होते. गोव्यात (Goa) देखील या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री(Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीचे  आश्वासन दिले आहे. 

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक साहाय्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. हणजूण येथे महिलेच्‍या डोक्यावर माड पडून ठार झालेल्या शीतल महादेव पाटील यांच्या मातोश्री मालू पाटील यांना आर्थिक मदतीचा धनादेश अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. राज्यात तिघांचा मृत्यू झाला होता त्यापैकी त्या एक आहेत. इतर दोघांच्या कुटुंबियांनाही ही मदत दिली जाणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com