राज्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा बळी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

राज्यात आज आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ६४७ वर पोहचली आहे. आज राज्यात १४४ कोरोनाग्रस्त सापडले, तर २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पणजी :राज्यात आज आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ६४७ वर पोहचली आहे. आज राज्यात १४४ कोरोनाग्रस्त सापडले, तर २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १८८४ इतकी आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.४० टक्के इतका आहे.

गेल्या चोवीस तासात १४०३ चाचण्या करण्यात आल्या. आज ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला तर ३१ रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजून खाट शिल्लक आहेत. उत्तर गोव्यात २०७ खाट तर दक्षिण गोव्यात १९४ खाट शिल्लक आहेत.

डिचोली आरोग्य केंद्रात ५४ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ५८ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ११० रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ७२ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ११४ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १७४ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ११७ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १३६ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ५३ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

दैनंदिन मृत्यू संख्येत देशात घट 
देशात गेल्या २४ तासांत ५० हजारपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ४५,९०२ कोविड- १९ रुग्णांची नोंद झाली. कोविडसंदर्भातल्या सूचनांचे योग्य पालन करण्याबाबतचे जनआंदोलन यशस्वी ठरत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णसंख्येचा आलेख घटता राहिला आहे.

संबंधित बातम्या