‘कोरोना’मुळे पुन्हा चार जणांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

राज्यात आज आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला  ज्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ६५१ वर पोहचली आहे.

पणजी: राज्यात आज आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला  ज्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या ६५१ वर पोहचली आहे. आज राज्यात १८० कोरोनाग्रस्त सापडले तर १९९ जण कोरोनमुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १८६१ इतकी आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.४६ टक्के इतका आहे.

आज झुआरीनगर येथील ५७ वर्षीय महिला, फोंडा येथील ६० वर्षीय पुरुष, कोलवा येथील ५४ वर्षीय पुरुष आणि मुरगाव येथील ७० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. यातील दोन मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि दोन इएसआय रुग्णालयात झाल्याची माहिती मिळाली. चोवीस तासांत १५७८ चाचण्या करण्यात आल्या. ११० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला तर २९ रुग्णांना इस्पितळात भरती केले. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजून खाट शिल्लक आहेत. उत्तर गोव्यात २०३ खाट तर दक्षिण गोव्यात २०३ खाट शिल्लक आहेत.

डिचोली आरोग्य केंद्रात ४९ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ५१ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ९४ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ७८ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ९५ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १५३ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात १२२ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १५७ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ५६ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

भारतात दैनंदिन रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी
भारताने सहा दिवसांनतर दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा ४० हजारांपेक्षा कमी नोंदवला. गेल्या २४ तासांतील नवीन रुग्णसंख्या ही ३८,०७३ एवढी नोंदवली गेली. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नव्या केसेस ५० हजारांहून कमी आहेत. गेल्या तीन चार दिवसांमध्ये काही देशांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. म्हणजे दैनंदिन १ लाख एवढे जास्त;  या पार्श्वभूमीवर हे विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या काही आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील उपचाराधीन कोविडबाधित रुग्णसंख्या ५,०५,२६५ पर्यंत घसरली आहे. या उताराला अनुसरून देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण फक्त ५.८८ टक्के एवढे नोंदवले गेले. रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत ९२.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजची रोगमुक्तांची एकूण संख्या ७९,५९,४०६ नोंदवली गेली. रोगमुक्तांच्या आणि उपचाराधीनांच्या संख्येतील दरी वाढत ७४,५४,१४१ एवढी नोंदवली गेली आहे.

संबंधित बातम्या