Mopa Airport|वास्‍तव! मोपा विमानतळाला अजून चार महिन्यांचा अवकाश

वास्‍तव : विमानतळ परिसरात जमीन सपाटीकरण, सुशोभिकरणाला सुरवातही नाही; अनेक आवश्‍‍यक कामांची पूर्तता बाकी
Mopa Airport
Mopa Airport Dainik Gomantak

पणजी: मोपा विमानतळ सुरू होण्यासाठी राज्य सरकारने दिलेले वायदे प्रत्यक्षात उतरले नसले तरी आता ऑक्‍टोबरमध्‍ये मोपा विमानतळ कार्यान्‍वित होईल, असे संकेत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. मात्र, विमानतळावरील वास्‍तव परिस्थिती पाहता आवश्‍‍यक साधना-सुविधा, इतर अनेक कामे होणे अद्याप बाकी असल्‍याने संपूर्ण कामे पूर्ण होऊन प्रत्‍यक्ष विमानसेवा डिसेंबरमधील अखेरच्‍या आठवड्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे.

(Four more months to complete Mopa airport)

Mopa Airport
Goa Crime News|बायणा येथील ती हत्या पूर्ववैमनस्यातून केल्याचा प्राथमिक अंदाज

उपलब्‍ध माहितीनुसार, केंद्रीय नागरी उड्डाण खात्‍याकडून राज्‍य सरकारच्‍या यंत्रणांना नुकत्याच कानपिचक्‍या मिळाल्यानंतर मोपा विमानतळ कामाला वेग आला आहे. गोव्‍याच्‍या दृष्‍टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणारा हा प्रकल्‍प कधी पूर्ण होईल, याची गोमंतकीयांना प्रतीक्षा आहे. विमानतळ पूर्णत्‍वाच्‍या अनुषंगाने राज्‍य सरकारकडून यापूर्वी काही तारखा देण्‍यात आल्‍या. मात्र, प्रत्‍यक्षात ‘तो’ मुहूर्त अद्याप आलेला नाही. आज रन-वे चाचणी होत असतानाचे व्‍हिडिओ व्‍हायरल झाले. त्‍यातही धावपट्टी नजीकच्‍या भागात जेसीबी, पोकलेन दिसत होते. त्‍यावरून अनेक कामे होणे बाकी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com