संपूर्ण गोव्यात वर्षभर होणार मोफत हेल्मेट वितरण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

गोव्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मडगाव वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वितरीत केली.

सासष्टी: राज्यात रस्त्यावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ही बाब लक्षात घेऊन समाज कार्यकर्ते दिग्विजित चव्हाण यांनी गोव्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मडगाव वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वितरीत केली. मोफत हेल्मेट वितरीत करण्याची ही मोहीम संपूर्ण गोव्यात वर्षभर राबविण्यात येणार आहे, असे यावेळी दिग्विजित चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी तसेच वाहने चालविताना वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे या उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येत असून या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहनचालकांच्या भल्यासाठी आपण मोफत हेल्मेट वितरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिग्विजित चव्हाण यांनी सांगितले. 

गोवा विधानसभा अधिवेशन : विरोधकांच्या कोळसा आमका नाकाच्या घोषणा -

सामान्य लोकांमध्ये वाहतूक व रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून हा सप्ताह यंदाही साजरा करण्यात येत आहे. गेल्यावर्षी रस्त्यावर झालेल्या अपघातात 225 जणांचे निधन झाले आहे. वाहनचालकांनी पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे, असे मडगाव वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक गौतम साळुंके यांनी सांगितले.

संबंधित बातम्या