उद्योजकांकडून गोवा सरकारवर टीका

घरांना मोफत; तर उद्योगासाठी महागडे पाणी
उद्योजकांकडून गोवा सरकारवर टीका
Free Water Supply: Entrepreneurs criticize Goa governmentDainik Gomantak

पणजी: सरकारने (Goa Government) एका बाजूने घरगुती वापरासाठी 16 हजार लिटर पाणी फुकट देण्याची (Free Water Supply) घोषणा केली खरी, परंतु दुसऱ्या बाजूने औद्योगिक वापरासाठीच्या (Industrial Use) कच्च्‍या पाण्याचे (Water) दर भरमसाट वाढवले आहेत.

औद्योगिक वापरासाठी 39 रुपये प्रति हजार लिटर असा सरकारचा पाणी पुरवठ्याचा दर होता. तो आता 78 रुपये प्रति हजार लिटर असा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्र व्यवस्थापकांनी परिपत्रक काढून कंपन्यांना दरवाढीची माहिती दिली आहे. 1एप्रिल 2021 या पूर्वलक्षी प्रभावाने ही दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे एप्रिल ते ऑगस्टपर्यंतचा दराचा फरक औद्योगिक आस्थापनांना आता फेडावा लागणार आहे.

Free Water Supply: Entrepreneurs criticize Goa government
Goa Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सव SOPचा 'तो' आदेश तात्काळ मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोफत पाणी मिळवण्यासाठी ‘पाणी वाचवा’ असे आवाहन मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करताना केले होते. आता या सरकारी पावलामुळे मते मिळवण्यासाठी मोफत पाणी असे सरकारी धोरण दिसते अशा प्रतिक्रिया उद्योगजगतातून ऐकायला मिळत आहेत.

Free Water Supply: Entrepreneurs criticize Goa government
Goa : एएसजी आय इस्‍पितळाची ३९वी शाखा गोव्‍यात

राज्य सकल उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलणारे उद्योग क्षेत्र गेले 18 महिने अस्तित्व कायम ठेवण्यासाठी झुंजत आहे. कोविड कठीण काळात सरकारने मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना आखावी यासाठी उद्योजकांनी सरकारला वारंवार विनंती केली. मात्र सरकारला उद्योग क्षेत्रापेक्षा मतांचीच जास्त चिंता आहे, अशी टीका आता उद्योग क्षेत्रातून होऊ लागली आहे.

"सरकारने औद्योगिक पाणीपट्टीत वाढ केल्याने उद्योगांना टॅंकरमधील पाणी विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा होईल आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे."

- दामोदर कोचकर, गोवा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com