भांगराळे गोंयकार पुरस्कारासाठी स्वातंत्र्यसैनिक करमली यांची निवड

भांगराळे गोंय अस्मिताय ही संस्था दरवर्षी भांगराळे गोेंयकार व नित्य युवा पुरस्कार प्रदान करते.
Award
AwardDainik Gomantak

सासष्टी: भांगराळे गोंय अस्मिताय ही संस्था दरवर्षी भांगराळे गोेंयकार व नित्य युवा पुरस्कार प्रदान करते. यंदा भांगराळे गोयकार पुरस्कारासाठी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांची तर नित्य युवा पुरस्कारासाठी स्नेहा सबनीस यांची निवड करण्यात आली आहे.

(Freedom fighter Karmali selected for Bhangrale Gonyakar Award)

Award
‘डीएसएसवाय, लाडली लक्ष्मी योजनांचा लाभ द्या’

हे दोन्ही पुरस्कार आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष राजेश प्रभू यांनी संदीप प्रभुदेसाई सचिव व पंकज नमशीकर (खजिनदार) यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरुप असून हे पुरस्कार 29 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवस्थान सभागृहात प्रदान केले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नागेश करमली हे स्वातंत्र्यसैनिक असून 1952 पासून त्यांनी गोव्याच्या मुक्ती संग्रामात महत्वाचे योगदान दिले. कोकणी चळवळीतील एक संघटक स्व. नित्यानंद नाईक याच्या स्मृतीनिमित्त युवा पुरस्कार यंदा स्नेहा सबनीस यांना देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com