स्वातंत्र्यवीर सावरकर अपप्रचाराचे बळी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

‘गोमंतक’ आणि ‘1857 चा स्वातंत्र्य समर’ पुस्तके पुनर्मुद्रित करणार
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: स्वातंत्र्यवीर सावरकर हे अगम्य शूर वीर होते. ब्रिटिश राजवटीत सर्वांत कठोर शिक्षा त्यांना भोगावी लागली. तरीही स्वातंत्र्यानंतर काही लोकांच्या अपप्रचाराचा ते बळी ठरले, अशी खंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

इंडियन सिनेमा हेरिटेज फाऊंडेशन आणि गोवा मनोरंजन सोसायटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या कुमाऊ लिटररी महोत्सवाची सांगता सावंत यांच्या उपस्थितीत झाली. या महोत्सवात त्यांच्या हस्ते इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ यांच्या ''सावरकर'' या हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

CM Pramod Sawant
भारताने थॉमस कप पटकावला; कांपाल इनडोअर स्टेडियममध्ये आनंदाला उधाण

गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चारशे वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीज राजवट असतानाही सावरकरांनी ‘गोमंतक’ नावाचे पुस्तक लिहिले. पोर्तुगिजांच्या दडपशाहीखाली गोव्याची झालेली दुर्दशा आणि गोवा मुक्तीची गरज याची मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये विस्तृतपणे केली. ‘गोमंतक’ आणि ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ ही सावरकरांची दोन पुस्तके गोवा सरकारच्या वतीने पुनर्मुद्रित करण्यात येतील. याशिवाय विक्रम संपथ यांनी लिहिलेली पुस्तके राज्यातील सर्व ग्रंथालयांबरोबर सर्व शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. यावेळी डॉ. बिबेक देब्रॉय यांचेही भाषण झाले. सुमंत बत्रा यांनी आभार मानले.

CM Pramod Sawant
डिचोलीत जलवाहिनीला भगदाड, पाण्याची नासाडी

मान्यवरांचा सहभाग

कुमाऊ लिटररी महोत्सवात विचारवंत, मान्यवरांनी मत मांडले. साहित्य, सिनेमा अशा विषयांवर झालेल्या चर्चेत अमित गांगर, अनंत विजय, आशा बत्रा, अशोक माहेश्वरी, बालाजी रामचंद्रन, बरून चंद्रा, बिबेक देब्रॉय, दिलीप पुरी, फराह नाज, हिराणी श्रीनिवासन, गजरा कोठारी, के. के. मोहम्मद, हेमा सुध, मनोज त्रिपाठी यांनी भाग घेतला.

इतिहास स्वतंत्र हवा!

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, इतिहास हा स्वतंत्र असावा. तो वस्तुस्थितीवर आधारित असावा. आपल्यावर लादलेला इतिहास हा चुकीच्या गृहितांवर आधारलेला आहे. सावरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com