दक्षिण गोव्यात घडली दुर्दैवी घटना; कारमध्येच घेतला महिलेने शेवटचा श्वास

In front of South Goa District Hospital Woman dies in car
In front of South Goa District Hospital Woman dies in car

मडगाव: याला निष्काळजीपणा म्हणावं की नशिब? एक दुर्दैवी घटना दक्षिण गोव्यात(South Goa) घडली आहे. बेटालभाटीमच्या(Betalbatim) एका महिलेने कार मध्येच शेवटचा श्वास घेतला. ती तिच्या नवऱ्यासह काल मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात(South Goa Hospital) दाखल होण्यासाठी आली होती. ती अत्यंत आजारी होती. तासंन्तास ती होस्पिटलच्या बाहेर कार मध्ये आपल्या जिवनाचे शेवटचे क्षण मोजत होती पण तिला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले नाही.(In front of South Goa District Hospital Woman dies in car)

शेवटी बेटालभाटीम मधील भीमवाडो च्या एकोणतीस वर्षांच्या ऑगस्टा फर्नांडिसने रूग्णालयापुढेच प्राण सोडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सोमवारी आपल्या राहत्या घरी आजारी पडली त्यानंतर तिने अपोलो हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणी केली. मात्र कोरोना चाचणी अहवाल अद्याप आलेला नव्हता मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते.

पण तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही आणि तिची तपासणीही केली गेली नाही. पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत ती कारमध्येच राहिली आणि तिथेच तिचे निधन झाले. तिच्या नवऱ्याने तिला रूग्णालयाच्या बाहेरून तसेच घरी परत आणले. स्थानिक आमदार विल्फ्रेड उर्फ ​​बाबाशन डिसो यांनी या प्रकरणात लक्ष दिल्याने मृत्यू प्रमाणपत्र मिळाले आणि सायंकाळी पाच वाजता त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आला.

बेतालबाटीमचे सरपंच कॉन्स्टन्शिओ मिरांडा, जे या परिस्थीतीत संपूर्ण कुटुंबासोबत होते त्यांनी अंत्यसंस्कारासाठी महिलेच्या कुटूंबाला शेवटपर्यंत मदत केली. ऑगस्टा यांच्या पश्चात त्यांचे पती आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com