भरपावसात प्लास्टिक डोक्यावर घेऊन बांबोळीत गाडेधारकांचे उपोषण

उपोषणकर्त्यांनी बसायचे प्लास्टिक डोक्यावर घेत पावसापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न केला.
भरपावसात प्लास्टिक डोक्यावर घेऊन बांबोळीत गाडेधारकांचे उपोषण
fruits owners go on hunger strike in rain at bambolimDainik Gomantak

पणजी: गोमेकॉ इस्पितळाच्या आवाराबाहेर फळ-भाजी विक्रेते तसेच गाडेधारकांनी आपल्‍या पुनर्वसनासाठी गेल्या सोमवारपासून सुरू केलेले साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी सकाळी जोरदार पावसातही सुरू होते. उपोषणकर्त्यांनी बसायचे प्लास्टिक डोक्यावर घेत पावसापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न केला. सरकार जोपर्यंत पुनर्वसनासाठी बांधकाम सुरू करत नाही, तोपर्यंत कितीही अडचणी किंवा समस्या आल्या तरी उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी ठासून सांगितले.

या विक्रेत्‍यांची तसेच गाडेधारकांची मागणी मान्य करण्याचे आश्‍वासन देणारे सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस व सांत आंद्रेचे आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा हे आजपर्यंत उपोषणस्‍थळी फिरकलेलेच नाहीत, त्यामुळे उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सरकारने आश्‍वासन पाळले नाही तर आंदोलनात सहभागी होण्याची या आमदारांनी ग्वाही दिली होती. मात्र त्यांनीही मुख्यमंत्र्यांप्रमाणेच पोकळ आश्‍वासने देऊन उपोषणकर्त्यांना रस्त्यावर बसण्यास भाग पाडले, असा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला.

fruits owners go on hunger strike in rain at bambolim
राज्‍यात सांस्कृतिक प्रदुषणाची पातळी वाढतेय

गोमेकॉ इस्पितळाच्या आवाराच्‍या बाहेरील एका झाडाखाली बसून उपोषणकर्ते त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी लढा देत आहे. गेल्या जुलैमध्ये सरकारने बुलडोझर फिरवून सर्व गाडे जमीनदोस्त केले व विक्रेत्यांना हटविले होते. आता पाच महिने होऊन गेले तरी त्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी सरकारने पावले उचलेली नाहीत.

fruits owners go on hunger strike in rain at bambolim
Goa Politics: राजकारणात समाज आणणे कितपत योग्य?

84 कुटुंबांना बसलाय फटका

सरकारने गाडे व विक्रेत्‍यांना हटविल्याने सुमारे 84 कुटुंबांना फटका बसला आहे. सरकारकडून गाळे बांधून मिळतील, या आशेवर ते दिवस काढत आहेत. मात्र सरकारच चालढकलपणा करत आहे. सामान्यांना न्याय देण्यास कायदेशीर प्रक्रियेची गरज लागते, तर प्रकल्पांना त्याची गरज लागत नाही का? असा सवाल एका विक्रेत्‍या महिलेने उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com