सावियो कुतिन्हो यांनी वाचला मडगाव नगरपालिकेच्या घोटाळ्याचा पाढा

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

विशेष म्हणजे उत्सवात नगरसेवकांतर्फे  लावण्यात आलेले जाहिरात  फलक घोटाळा असे कित्येक घोटाळ्यांचा पाढाच पत्रकार परिषदेत शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी वाचला.

नावेली: मडगाव येथील शेडो कौन्सिल फॉर मडगावच्यावतीने मागील पाच वर्षांत मडगाव नगरपालिकेत सुरू असलेल्या घोटाळ्यांचा संपूर्ण तपशील सादर करण्यात आला. यात बायोमिथेन कचरा प्रकल्प, कामगार वेतन घोटाळा, नाला बांधकाम निविदा घोटाळा, सोनसोडो येथील आग्निशमन यंत्रणा घोटाळा,  विशेष म्हणजे उत्सवात नगरसेवकांतर्फे  लावण्यात आलेले जाहिरात  फलक घोटाळा असे कित्येक घोटाळ्यांचा पाढाच पत्रकार परिषदेत शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी वाचला.

त्यांनी पुढे सांगितले, की मडगाव नगरपालिकेत मागील  पाच वर्षात जास्त प्रमाणात  घोटाळेच घडले आहेत. यापैकी अनेक घोटाळ्यांच्या पर्दाफाश करण्यात यश आले तर कित्येक घोटाळ्यांचा काही थांगपत्ता नाही.  यात अनेक मोठे घोटाळे घडले आहेत. यात बायोमिथेन कचरा प्रकल्प हा असून येथील प्रकल्पात मडगाव नगरपालिकेने दोन कोटी जास्त रक्कम दाखविली आहे. आणखी एका नगरपालिकेत हा कचरा प्रकल्प असून तेथील व मडगावमधील निविदेत मोठी तफावत  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबरोबरच सोनसोडो  येथेही अग्निशमन यंत्रणा घोटाळा  घडला आहे.

पहिल्यांदा ही यंत्रणा येथे कार्यान्वित करण्यासाठी २६  लाख रुपये पाण्यात वाया घालविण्यात आले होते. त्यावर आणखी निविदा काढून  करोड रुपयांचा घोटाळा ही करणऱ्यात आला असल्याचे कुतिन्हो  यांनी सांगितले.
अन्य  एका मुख्य घोटाळा याबद्दल बोलताना सावियो यांनी सांगितले, की ४५ कामगार रोजंदारीवर घेण्याची निविदा काढून केवळ २०  ते ३० कामगारांना कामावर नेमले आहे. याविषयी नगरपालिकेत तक्रार करण्यात आली होती. मात्र, याच कंत्राटदाराला पुढील कामासाठी  ७५  तात्पुरत्या स्वरूपाचा कामगारांना घेण्याची पुन्हा निविदा देण्यात आली आहे. असले प्रकार मागील पाच वर्षात घडले असून मडगाव येथील राजेंद्र प्रसाद स्टेडियमजवळ असलेल्या नाल्यावर पदपथ उभारून त्याला सिमेंटचा लेप लावण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या