घरच्या सुनबाईनेच पाठविले लोबो भगिनींचा यमसदनी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

रविवारी रात्री खुनी हल्ल्यात मरण पावलेल्या मार्ना शिवोलीतील मार्था तसेच व्हेरा लोबो या  सख्ख्या बहिणींवर मंगळवारी दुपारी स्थानिक सिमेंटरीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दफनविधी कार्यक्रम झाला.

शिवोली : रविवारी रात्री खुनी हल्ल्यात मरण पावलेल्या मार्ना शिवोलीतील मार्था तसेच व्हेरा लोबो या  सख्ख्या बहिणींवर मंगळवारी दुपारी स्थानिक सिमेंटरीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दफनविधी कार्यक्रम झाला. यावेळी सेंट एन्थॉनी चर्चचे धर्मगुरु, वडिलधारी मंडळ तसेच शिवोली पंचायतचे माजी सरपंच सिल्वेस्टर फर्नांडिस, तसेच मार्ना प्रभागाचे पंच सदस्य विलीयम फर्नांडिस  उपस्थित होते.

 दरम्यान, मार्था तसेच व्हेरा यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना यमसदनी पाठविण्याच्या कामात मुख्य आरोपी असलेल्या घरच्या सुनबाई रोव्हीना लोबो तसेच अन्य एक सहकारी शोभन राज्याबली यांच्या हणजुण पोलिसांनी  रविवारी मध्यरात्री आंसगांव येथील एका भाड्याच्या खोलीतून ताब्यात घेण्यात यश मिळवीले होते . सध्या त्या़ची रवानगी हणजुण पोलिस स्थानकाच्या पोलीस कोठडीत सात दिवसांच्या रिमांडवर  करण्यात आली आहे.

दरम्यान, या दुहेरी खुनाचा तपास लावण्याच्या कामात हणजुण पोलिस स्थांनकाचे निरीक्षक सुरज गांवस तसेच म्हापसा पोलीस निरिक्षक तुषार लोटलीकर यांनी उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत अवघ्या सहा तासांत खुन्यांचा शोध लावण्यात यश मिळवीले होते. शिवोली ग्रामच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या या दुहेरी हत्यांकांडामुळे पंचक्रोशीतील जेष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हां एकदां ऐरणीवर आला असून सरकारने याबाबतीत ठोस उपाययोजना आखण्याची मागणी याभागातील सामाजिक संस्था तसेच जाणकार लोकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या