सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर उद्या गुरूवार  14 जानेवारी रोजी आडपई, फोंडा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

पणजी : सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर उद्या गुरूवार  14 जानेवारी रोजी आडपई, फोंडा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सोमवारी गोकर्ण नजीक हिल्लूर-होसकांबी  गावात झालेल्या भीषण अपघात सौ. विजया नाईक या मरण पावल्या.

आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या त्या पत्नी होत्या. श्रीपाद नाईक या अपघातात जखमी  झाले असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय  (GMC) मध्ये उपचार चालू आहेत.
उद्या सकाळी 8 ते 9 या दरम्यान अंतीम दर्शनासाठी सौ. विजया नाईक यांचे पार्थिव त्यांच्या सापेंद्र, रायबंदर येथे ठेवण्यात येणार आहे. 

त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, आडपई येथे आणण्यात येईल.  सकाळी 9.30 ते 12 पर्यंत लोकांना अंतिम दर्शन घेता येईल. त्यानंतर अंतिम यात्रा त्यांच्या आडपई येथील निवासस्थानाहून स्मशानभूमीकडे निघेल. त्यांच्या मागे त्यांचे तीन पुत्र सिद्धेश, साईश व योगेश, अनुक्रमे स्नुषा स्वनुपा, प्रतीक्षा व ॲड. अदिती आणि  नातवंडे अयंश, आयूष व पार्थवी असा मोठा परिवार आहे.

आणखी वाचा:

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना दिल्लीला हलवणार नाही ; एम्सच्या तज्ज्ञांची माहिती -

संबंधित बातम्या