‘त्‍या’ मृत महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार

‘त्‍या’ मृत महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार

मडगाव  ः

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या चंद्रवाडा - फातोर्डो येथील ७६ वर्षीय महिलेवर येथील होली स्पिरीट चर्चच्या दफनभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेच्या कुटुंबातील दोन सदस्य तसेच कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व धर्मगुरु अंत्यविधीला उपस्थित होते. रविवारी दुपारी ३.४५ वा.च्‍या दरम्यान या महिलेवर अंत्यविधी करण्यात आले. होली स्पिरिटी चर्चचे दोन फादरही यावेळी उपस्थित होते. कोरोना संबंधित नियमांचे पालन करून ख्रिश्चन पद्धतीनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मृत महिलेच्‍या कुटुंबातील
सहाजणांना बाधा
 वैद्यकीय सल्ल्याचे पालन करताना मृतदेह चर्चमध्ये न नेता थेट दफनभूमीत नेण्यात आला. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हे दफनभूमित उपस्थित राहिले. मृत महिलेच्या कुटुंबातील सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोविड निगा केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दोघे वगळता इतर कुटुंबियांना अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. 
आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी या महिलेचे अंत्यसंस्कार सन्मानाने व्हावे यासाठी पुढाकार घेतला. कोविड इस्पितळातून मृतदेह इस्पितळातून दफनभूमीत नेण्यासाठीही ते गेले होते. मृत व्यक्तिचाही सन्मान केला पाहिजे. उगाच भिती कशाला बाळगायची. मृत झालेल्या कोरोना रुग्णांबद्दल गैरसमज बाळगू नये. अशा कामात पुढाकार घेतलाच पाहिजे, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले. 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com