Mapusa Fire : काणका येथे फर्निचर शोरूमला आग; दहा लाखांचे नुकसान

आगीत शोरूममधील किंमतीचे सोफासेट, कपाट, फर्निचर, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड तसेच गाद्या, बाथटब यासह किंमती साहित्य जळून खाक झाले.
Mapusa Fire
Mapusa FireDainik Gomantak

Mapusa Fire : काणका येथील ‘कासा मार्किस’ या फर्निचर शोरूमला आज शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. ही आग लागल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हापसा अग्निशमन दलाने म्हटले आहे. हे आस्थापन माजी सरपंच मिल्टन मार्किस यांच्या मालकीचे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना ही शनिवारी (ता.8 ऑक्टोबर) सकाळी 8 च्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत शोरूममधील किंमतीचे सोफासेट, कपाट, फर्निचर, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड तसेच गाद्या, बाथटब यासह किंमती साहित्य जळून खाक झाले. हे शोरुम तळमजला आणि पोटमजल्यावर पसरलेले असून फक्त तळमजल्यावर आगीने पेट घेतला. या आगीमुळे आस्थापनात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

Mapusa Fire
Goa Politics : गोमंतकीय राजकारणावर पक्षांतराचा कलंक

दरम्यान, म्हापसा अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तासभरात ही आग नियंत्रणात आणली. म्हापसा अग्निशमन दलाचे प्रभारी बॉस्को फेर्राव, प्रशांत शेटगांवकर, आनंद बांदेकर, दिलीप सावंत, विष्णू नाईक, जितेंद्र नाईक यांनी या बचावकार्यात भाग घेतला. तसेच मदतीसाठी पिळर्ण अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी गेली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com