मडगावात सामाजिक अंतराचा फज्जा

प्रशांत शेट्ये
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

मडगावात दररोजच सामाजिक सुरक्षित अंतराचा फज्जा उडत असून याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

नावेली
मडगावात दररोजच सामाजिक सुरक्षित अंतराचा फज्जा उडत असून याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सकाळी मडगाव मार्केटमध्ये फळे, केळी व भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याने मडगावात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्यामुळे सकाळच्यावेळी पोलिसांनी मार्केटमध्ये गस्त घालून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे.
जुना पिक अप स्टँड व पिंपळकटा येथे सकाळी घाऊक फळ बाजार भरत असून लोक सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन कुठेही करताना दिसत नाहीत गांधी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून याठिकाणी सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्याचे दिसून येते, या बरोबरच एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये तर मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, असे आनंद नाईक यांनी सांगितले.
मडगावात लिली गार्मेंट ते कारो कॉर्नर रस्त्यावर परराज्यातील जीप गाड्या थेट रस्त्यावर उभ्या करून वाहनातून फळ विक्री करताना दिसतात काही ठिकाणी तर हात गाडेधारक गर्दी करून फळे खरेदी करतात.दरम्यान त्यांच्यात कोणतेही सामजिक अंतराचे पालन होत नसल्याचे दृष्टीस पडते.
त्या नंतर गांधी मार्केटमध्ये सकाळी घाऊक भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने कोरोना संक्रमण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Editing - 
Sanjay ghugretkar

संबंधित बातम्या