गोवा पालिका निवडणूकांचे भवितव्य खंडपीठाच्या निर्णयावर ठरणार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राज्य निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावणीवेळी आयोगाला धारेवर धरत कानउघाडणी केली.

पणजी : राज्यातील आगामी पालिका निवडणुकीसाठी 4 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या प्रभाग आरक्षण व फेररचना अधिसूचनेला तसेच पालिका कायद्यातील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या नऊ याचिका न्यायालयात सादर झाल्या होत्या. या याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आल्या. 

गोवा नगरपालिका निवडणूक 20 मार्चला; आजपासून आचारसंहिता लागू

पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण व फेररचनेला आव्हान दिलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणी आज ठेवण्यात आली असताना राज्य निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावणीवेळी आयोगाला धारेवर धरत कानउघाडणी केली. या याचिकांवरील सुनावणी सध्या खंडपीठात सुरू आहे त्यामुळे २० मार्चला घोषित केलेल्या पालिका निवडणुकीचे भवितव्य खंडपीठाच्या या निवाड्यावर ठरण्याची शक्यता आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या