ताळीगावचा प्रस्तावित आयटी प्रकल्प धूळ खात

आतिश नाईक 
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

प्रस्तावित राजीव गांधी आयटी निवासस्थानासाठी गोवा सरकारने ही जमीन घेतली होती. तालीगावच्या नागरिकांनी हा 'रिअल इस्टेट घोटाळा' आहे, असा दावा करत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती.

पणजी- ताळीगावचे तत्कालीन आमदार बाबुश मॉन्ससेरेट आणि  गावकर्‍यांच्या आंदोलनानंतर अपूर्ण राहिलेला प्रस्तावित आयटी प्रकल्प अनेक वन्य वनस्पती, फुले आणि झाडे वाढल्यामुळे आता हिरवागार दिसत आहे. परंतु, या प्रकल्पासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधांवर खर्च केलेला पैसा वाया गेल्याचे दिसते. या प्रकल्पासाठी करण्यात आलेले सांडपाणी गटारे, विद्युत खांब, सुरक्षा कक्ष आता खराब होत आहेत.

प्रस्तावित राजीव गांधी आयटी निवासस्थानासाठी गोवा सरकारने ही जमीन घेतली होती. तालीगावच्या नागरिकांनी हा 'रिअल इस्टेट घोटाळा' आहे, असा दावा करत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती. हा प्रकल्प 2007 चा आहे.

 येथील परिसर विनावापर ठेवून आता चिंबल गावच्या कदंबा पठार येथे प्रस्तावित आयटी पार्क प्रोजेक्टसाठी सरकारने नवीन जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, ग्रामस्थांच्या विरोधामुळे हेदेखील काम अपूर्ण राहिले आहे.
 

संबंधित बातम्या