दिल्लीत G20 शिखर परिषद मग गोवा, मसुरी, आग्रा, हरिद्वार येथील हॉटेल्स फुल्ल का झालीयेत?

G20 मुळे दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि बँका तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
G20 New Delhi summit 2023
G20 New Delhi summit 2023

G20 New Delhi summit 2023: भारतात प्रथमच G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. G20 परिषदेसाठी जगभरातून पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. राजधानी दिल्लीत 9 आणि 10 तारखेला G20 शिखर परिषद होणार आहे.

G20 मुळे दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि बँका तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे दिल्लीकरांना मौजमजा करण्यासाठी तीन दिवसांची सुट्टी मिळाली आहे.

तीन दिवसांचा लॉग वीकेंड साजरा करण्यासाठी दिल्लीकर बाहेर पडले आहेत. G20 मुळे केवळ दिल्लीतच नाही तर जयपूर, नैनिताल, मसुरी, गोवा, ऋषिकेश, आग्रा, अमृतसर, हरिद्वार, वैष्णोदेवी येथेही हॉटेल बुकिंगची मागणी वाढली आहे. इतर दिवसांच्या तुलनेत दिल्ली आसपासच्या पर्यटन स्थळांवर हॉटेल बुकिंग 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहे.

'दिल्लीतील लोक सलग तीन दिवस सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. गोवा, जयपूर, आग्रा, अमृतसर, मसुरी या शहरांतून सर्वाधिक मागणी आहे. भूस्खलनामुळे लोक हिमाचल प्रदेशात जाणे टाळत आहेत. मात्र, उत्तराखंडमधील शहरांना भेट देणाऱ्यांची संख्या बरीच जास्त आहे. तसेच, नैनितालमध्ये जवळपास 75 टक्के हॉटेल्स बुक झाली आहेत.' अशी माहिती इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष राजीव मेहरा यांनी एका हिंदी वृत संकेतस्थळाला दिली आहे.

G20 New Delhi summit 2023
37th National Games Goa 2023: राष्ट्रीय स्पर्धेचे आणखी एक पाऊल पुढे; मशाल प्रज्वलित

G20 मुळे दिल्लीतील लोकांना मिळालेल्या सुट्टीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत. दिल्लीपासून जवळचे पर्यटनस्थळ असलेल्या मसुरीत दिल्लीकरांनी गर्दी केली आहे. साधारणपणे हा ऑफ सिझन असतो, पण सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे डोंगरांची राणी मसुरी पुन्हा गजबजली आहे. येथील 80 टक्के हॉटेल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे.

दिल्लीतील लाँग वीकेंडमुळे पर्यटनस्थळी हॉटेल्सच्या मागणीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. हॉटेल, गेस्ट हाऊस आणि होम स्टेसाठी सर्वाधिक बुकिंग झाले आहे. G20 ने हॉटेल उद्योगाला मोठी चालना दिली आहे. कोरोनामुळे हॉटेल उद्योगाला सर्वाधिक फटका बसला होता, परंतु G20 ने त्याची भरपाई केली. असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com