गालजीबाग नदीची खाडी बदलतेय आपली भौगोलिक रचना

पावसाळ्यात तौक्ते वादळावेळी गालजीबाग नदीने आपले मुख बदलले होते. किनारा फोडून नदीचे मुख समुद्राला मिळाले होते.
गालजीबाग नदीची खाडी बदलतेय आपली भौगोलिक रचना
गालजीबाग नदीच्या मुखाजवळ असे वाळूचे दांडे तयार होऊन नदीचे मुख असे विभागले आहे.Dainik Gomantak

काणकोण: गालजीबाग नदीची (Galjibag River) खाडी बाबरे- माशे येथे मुखाजवळ आपली भौगोलिक रचना (Geographical structure) बदलत आहे.पावसाळ्यात तौक्ते वादळावेळी गालजीबाग नदीने आपले मुख बदलले होते. किनारा फोडून नदीचे मुख समुद्राला मिळाले होते.

गालजीबाग नदीच्या मुखाजवळ असे वाळूचे दांडे तयार होऊन नदीचे मुख असे विभागले आहे.
राज्यातील बंद असलेली चार्टर विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची शक्यता

मात्र आता नदीच्या मुखाजवळ तीन वाळूचे दांडे तयार झाले आहेत.सद्या नदी तीन मुखातून समुद्राला मिळत आहे.तौक्ते वादळात मोठ्या प्रमाणात गालजीबाग किनाऱ्यावरील सुमारे पन्नास सुरुच्या झाडांची पडझड झाली होती.त्याचप्रमाणे त्यावेळी सुमारे वीस मीटर समुद्र आत पर्यत घुसला होता.हळूहळू समुद्र किनाऱ्याची भरण प्रक्रिया सुरू झाली आहे.मात्र तौक्ते वादळामुळे गालजीबाग व आगोंद किनाऱ्यावरील सागरी कासवांची घरटीही नष्ट झाली होती.सामान्यपणे ऑक्टोबर महिन्यात सागरी कासवांचे आगमन अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आगमन होते.वनखात्याने भौगोलिक रचना बदलेल्या किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com