South Goa : दक्षिण गोवा किनारपट्टी भागात धीरयाेंबरोबर जुगारही जोरात; पोलिसांची डोळेझाक

बड्या धेंडाचा हात
Dhiryo And Gambling in the South Goa coastal areas
Dhiryo And Gambling in the South Goa coastal areasDainik Gomantak

‘एक के उपर एक फ्री’ हा फॉर्म्युला आता कोलवा पोलिसांनीही अंगीकारला आहे की काय, हे कळत नाही; पण या पोलिस स्थानकाच्या हद्दीत जिथे धीरयो (बैलांच्या झुंजी) लावल्या जातात तिथे आता गडगडाही (जुगार) जोमात चालू असतो.

नवल वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे याबाबत सर्व जगाला माहिती असते. फक्त पोलिस अनभिज्ञ असतात. मागच्या रविवारी पेडा-बाणावली येथे धीरयोचे आयोजन केले होते. या जागेपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर गडगडाही चालू होता. धीरयो आणि गडगडा यावर लाखो रुपयांची पैज लावली जात होती.

Dhiryo And Gambling in the South Goa coastal areas
Souza Lobo Restaurant : सोझा लोबो हल्लाप्रकरणी नऊ संशयितांना सशर्त जामीन मंजूर

हे प्रकार फक्त बाणावली येथेच चालू नसून दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात सगळीकडेच चालू असतात. यासंबंधी पोलिसांना कळविल्यास एकतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा घटनास्थळी उशिरा पोहोचतात, अशी प्रतिक्रिया स्थानिक जॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

पैशांची उधळपट्टी

याप्रकरणी चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक राजकारण्याच्या पुतण्याच्या आशीर्वादाने हे सगळे प्रकार चालू असून त्यामुळे पोलिसही त्यांच्या वाटेला जात नाहीत.

या धीरयोंवर लोक लाखो रुपयांची पैज लावत असून गडगड्यावरही पैसे उधळले जात असल्याची माहिती असून कोलवा पोलिसांना विचारले तर ते हे आम्हाला काहीच माहीत नाही, असे सांगून कानावर हात ठेवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com