Digital Taxi Meters मोफत, गोवा टॅक्सी व्यावसायिकांना चतुर्थीची भेट

मीटरसह ट्रॅकिंग यंत्रणा, जीपीएस यंत्रणाही उपलब्ध होणार
Digital Taxi Meter
Digital Taxi MeterDainik Gomantak

पणजी: राज्यातील (Goa) टॅक्सी (Taxi) व्यावसायिकांना गणेश चतुर्थीची (Ganesh Chaturthi) भेट देताना राज्य सरकारने (Goa Government) टुरिस्ट टॅक्सींसाठी डिजिटल मीटर्स मोफत (Digital Taxi meters free for tourist taxis) देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, या मीटरसह ट्रॅकिंग यंत्रणा, जीपीएस यंत्रणाही सरकार उपलब्ध करणार आहे. यापूर्वी टॅक्सी व्‍यावसायिकांनी असे मीटर्स बसवल्यानंतर वर्षभरात त्यांना या मीटरच्या खर्चाचा परतावा टप्प्या-टप्प्याने करण्याची योजना सरकारने लागू केली होती. मात्र, त्याला टॅक्सी व्यावसायिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

Digital Taxi Meter
Digital Taxi Meter: गोव्यातील टॅक्सी मालकांना पुन्हा धक्का

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की गोवा माईल्सच्या टॅक्सींनाही डिजिटल मीटर्स बसवावेत ही टॅक्सी व्यावसायिकांची मागणी मान्य करण्यात आली आहे. याशिवाय टॅक्सी चालवण्यासाठी बॅजची सक्ती केली जाणार आहे. मीटर न बसवल्याने परवाने का रद्द केले जाऊ नयेत, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. तो प्रश्न सोडवण्यात येणार आहे. याविषयी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, की काळ्या पिवळ्‍या टॅक्सींना मीटर आहेत, मात्र ते कालबाह्य झाले आहेत. त्यांनाही डिजिटल मीटर, ट्रॅकिंग व जीपीएस यंत्रणा बसवावी लागेल. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर थोडा बाेजा पडणार आहे.

Digital Taxi Meter
Goa Taxi: डिजिटल मीटरमध्ये असणार ‘ॲप’प्रमाणेच सुविधा

सरकारी तिजोरीवर 34 कोटींचा बोजा

राज्यभरात 25 हजार टॅक्सी असताना आजवर केवळ अडीच हजार टॅक्सींनाच डिजिटल मीटर बसवण्यात आले आहेत. सहाशे जणांनी असे मीटर बसवण्यासाठी आरक्षण केले आहे. आता सर्वांनाच मोफत मीटर व यंत्रणा देण्यात येणार आहे. यामुळे यापूर्वीच्या योजनेनुसार डिजिटल मीटर विकत घेतलेल्यांना पूर्ण परतावा सरकारला द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे सरकारला 34 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com