Goa Taxi App: व्यावसायिक, ग्राहकांसह गोवा व्यापणार ‘टॅक्सी ॲप’, 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये

500 हून अधिक टॅक्सी ऑपरेटर आधीच या ॲप आधारित सेवेत सहभागी
Goa Taxi Aamchi Taxi
Goa Taxi Aamchi TaxiDainik Gomantak

Goa Government Launches Taxi App For Hassle-Free Transportation: बहुचर्चित ‘गोवा टॅक्सी ॲप’चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. हे ॲप गेल्या ६ महिन्यांपासून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी काऊंटरवर कार्यरत आहे.

500 हून अधिक टॅक्सी ऑपरेटर आधीच या ॲप आधारित सेवेत सहभागी झाले आहेत. उरलेल्या टॅक्सी व्यावसायिकांनीही या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटनमंत्री खंवटे यांनी केले आहे.

गोवा टॅक्सी ॲपची खासियत

 1. चालक नोंदणी आणि ग्राहक सेवेसाठी ॲप.

 2. राज्यातील रहिवासी आणि पर्यटकांसाठी कॅब सेवा.

 3. चालक, प्रवासी आणि कमांड सेंटरसाठी रिअल-टाईम अपडेट.

 4. किफायतशीर भाडे, वेळ, स्थान आणि मार्गांवर आधारित सेवा.

 5. स्थान सेवांसाठी गुगलवर नकाशांसह दिशादर्शन.

 6. पेमेंट : वॉलेट, सर्व कार्डस आणि युपीआय पेमेंटसाठी पेमेंट गेटवे.

Goa Taxi Aamchi Taxi
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

खास वैशिष्ट्ये

 • टॅक्सी बुक करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘गोवा टॅक्सी ॲप’ सहज डाऊनलोड.

 • केवळ १६ एमबी साईज

 • आतापर्यंत सुमारे ३० हजार पर्यटकांनी घेतला सेवेचा लाभ

 • कारपुलिंग आणि इतर उपक्रमांच्या प्रोत्साहनासाठी किनारपट्टी, औद्योगिक वसाहती आणि महत्त्वाच्या ठिकाणी सेवा.

 • प्रवाशांसाठी एसओएस (आणीबाणीच्या परिस्थितीत).

 • चालकांसाठी एसओएस (अपघात/ब्रेकडाऊनसंदर्भात)

 • दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी टॅक्सी बुक करणे सहजसोपे.

 • स्वस्त दरात चालकासहीत कॅब : स्वचलित कार किंवा बाईकपेक्षा श्रेयस्कर.

 • युनिफाईड टॅक्सी ॲपप्रणाली वापरून प्रवासी चालकास गुण देणे शक्य.

 • अयोग्य वर्तनाच्या कोणत्याही घटनांची करता येणार तक्रार.

 • कॉल सेंटरद्वारे मदतीची विनंती करता येणार.

 • महिला प्रवाशांच्या संरक्षणाशी संबंधित अनेक बाबींचा समावेश.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com