Ganesh Chaturthi 2021: पणजीतील गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi 2021) पणजी (Panaji) महापालिकेने नागरिकांसाठी तयार केली नियमावली
Panaji announces guidelines ahead of Ganesh Chaturthi 2021 (Representative image)
Panaji announces guidelines ahead of Ganesh Chaturthi 2021 (Representative image) Unsplash

गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi 2021) पणजी (Panaji) महापालिकेने नागरिकांसाठी तयार केलेली नियमावली महापौर रोहित मोन्सेरात यांनी आज जाहीर केली.

काय आहे पणजीतील गणेशोत्सवासाठी नियमावली (Guidelines for Ganesh Chaturthi in Goa):

  • गणेशोत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे प्रत्येकाने पालन करून सोशल डिस्टन्सिंग राखावे.

  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना नियम पाळावेत. मंडपात १०० पेक्षा कमी लोकांना अर्थात मंडपात क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश द्यावा.

  • प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती विक्री व खरेदीवर पूर्ण बंदी राहील.

  • गणेशमूर्ती आणण्यासाठी केवळ दोनच व्यक्ती चित्रशाळात असाव्यात.

  • खास गणेशोत्सवासाठी शोभेच्या दारूकामाची, फटाक्याची दुकाने थाटण्यास मनाई आहे. पूर्वीची दुकाने चालतील.

  • माटोळीचे सामान मिळेल तिथे न विकता मार्केटजवळील रॉयल फुडच्या परिसरातच ८ ते १० सप्टेंबर या काळात विकावे.

  • महापालिकेने ठरवलेल्या फेरी धक्का पणजी, मिरामार किनारा, करंजाळे किनारा, रायबंदर फेरी धक्का, बंदर कप्तान जेटी पणजी, मानसवाडा रायबंदर, फोंडवे रायबंदर, सापेंद्र रायबंदर, चार खांब मळा व सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालयाजवळ पाटो-पणजी या ९ जागीच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. मिरवणूक काढू नये. विसर्जन करताना तीन पेक्षा जास्त व्यक्ती सोबत जाऊ नये.

  • फटाके लावू नयेत. सोबतचे हार आदी निर्माल्य भांड्यात टाकावेत. पाण्यात टाकू नयेत.

  • वाहनांची गर्दी केली जाऊ नये, संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत विसर्जन करावे.

Panaji announces guidelines ahead of Ganesh Chaturthi 2021 (Representative image)
Ganesh Festival: पेण कसं झालं पुणे, मुंबई मधल्या लोकांसाठी "गणपती मूर्तीचं हब"?

या वेळी मार्केट समितीचे अध्यक्ष नगरसेवक प्रमेय माईणकर म्हणाले की, "महापालिकेची अष्टमी फेरी मंगळवारी ७ ते शुक्रवारी १० सप्टेंबर या काळात फेरीबोट धक्का ते कांपाल उद्यान या मांडवितीरी होणार आहे. प्रथम आलेल्यांना प्रथम या तत्त्वावर ५०० रुपये भरून जागा देण्यात येईल. प्रती चौ. मी. १०० रुपये प्रती दिवस असे भाडे असणार आहे. फक्त पारंपरिक वस्तू विकण्यास परवानगी असेल. कपडे, भांडी, खाद्यपदार्थ यांना मान्यता नसेल. तर माटोळी बाजार येथील रॉयल फुड जवळ भरणार असून ६० रुपये प्रती चौ. मी. असे त्यासाठी भाडे असेल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com