Ganesh Chaturthi in Goa: कोरोना SOPs अद्याप नाही

गोव्यात (Goa) गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi 2021) कोरोनाची विशेष ‘एसओपी’ (SOPs) अद्याप सरकारने जाहीर केली नाही
Goa government yet to issue SOP ahead of Ganesh Chaturthi in the state
Goa government yet to issue SOP ahead of Ganesh Chaturthi in the stateUnsplash

गोव्यात (Goa) गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi 2021) कोरोनाची विशेष ‘एसओपी’ (SOPs) अद्याप सरकारने जाहीर केली नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या ‘एसओपी’चे पालन काणकोणवासीयांनी करणे गरजेचे आहे. काणकोणमध्ये वाढत्या कोरोना संसर्गामुळे ते गरजेचे बनले असल्याचे मामलेदार विमोद दलाल यांनी सांगितले. (Ganesh Chaturthi in Goa: SOPs yet to be declared in the state)

यापूर्वी मामलेदार विमोद दलाल यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मते आजमावून पाहिली. यावेळी सर्वच मंडळानी दीड दिवस गणेशोत्सव साजरा करण्यावर एकमत केले. गर्दी टाळण्यासाठी पाळोळे, राजबाग, साळेरी, भाटपाल, पैंगीण लोलये, पोळे चौपाटी व अन्य ठिकाणी पोलिस तैनात करण्याची सूचना मामलेदारांनी पोलिसांना केली होती.

Goa government yet to issue SOP ahead of Ganesh Chaturthi in the state
Ganesh Festival: पेण कसं झालं पुणे, मुंबई मधल्या लोकांसाठी "गणपती मूर्तीचं हब"?

मडगावात घरोघरी सजावटीची तयारी सुरू

उत्साहाचे प्रतीक गणली जाणारी गणेश चतुर्थी आता अवघ्याच दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. कोविडचे सावट असतानाही घरोघरी बाप्पाच्या स्वागताच्या तयारीने नेट घेतलेला आहे.

मडगावातील काही घरात मखर व सजावटीची अन्य तयारीही आतापासूनच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एकंदरीत मडगावात चतुर्थीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. बाजारात जरी अजूनही चतुर्थीचा माहोल नसल्याचे बाजारकर सांगत असले तरी घरोनघरी तयारीने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

Goa government yet to issue SOP ahead of Ganesh Chaturthi in the state
Ganesh Chaturthi in Goa: गणेशभक्तांना नाही खर्चाची पर्वा

मडगावात चित्रशाळांनी वेगवेगळ्या भागांत त्यांची दालने सुरू केल्याने त्या-त्या भागातील गणेशभक्तांची सोय झाली आहे. या चित्रशाळांसमोर आज अनेकांनी उपस्थिती लावली होती. बहुतेक चित्रकारांनी मूर्तीवर शेवटचा हात फिरविलेला आहे व त्यांनी आपल्या चित्रशाळांवर प्रकाश योजना केल्याने तो परिसर उजळलेला आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप उभे राहिलेले असले तरी त्या ठिकाणी नेहमीचा जल्लोष दिसत नाही. एरव्ही गोकुळाष्टमीनंतर हे मंडप उभे राहत व तेथे आरत्या व भजनांच्या सिडींचा उत्साह असे. पण, गतवर्षीपासून कोविड निर्बंधामुळे तो उत्साह दिसून येत नाही. मडगावातील पिंपळ कट्यावरील वगळता यंदा अन्य सार्वजनिक गणेश उत्सव दीड दिवसाचेच राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com