‘हरमलचा राजा’ला दीड दिवसांनी निरोप

‘हरमलचा राजा’ला दीड दिवसांनी निरोप
‘हरमलचा राजा’ला दीड दिवसांनी निरोप

हरमल: येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा २७ व्या ‘हरमलचा राजा’ला दीड दिवसांनी निरोप देण्यात आला. सभागृह ते विसर्जन स्थळापर्यंत ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ अशी घोषणा देत भाविकांनी गणरायाला निरोप दिला. ‘कोरोना’च्या संकटामुळे अनंत चतुर्दशीऐवजी दीड दिवस उत्सव करण्याचा निर्णय घेतला होता.

यंदाची श्री गणेशमूर्ती माजी अध्यक्ष भाऊ गडेकर यांनी श्रीचरणी अर्पण केली होती. यावेळी विसर्जन सोहळ्यात सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. केशव, साईदास नाईक, गंगाराम, प्रदीप, रुपेश, रामकृष्ण माज्जी, हरेश मयेकर, मोहन नाईक रामजी, सुभाष, भरत, प्रदीप, रुपेश वस्त, सिद्धेश, उल्हास केपकर, प्रकाश, अक्षय, राघोबा, महादेव गावडे, विशाल, आपा वायंगणकर, साईश, दिगंबर, सागर, विजय, मनोज, संतोष कोरकणकर, उल्हास पै, आदींनी सहकार्य केले. ज्येष्ठ सदस्य तथा प्रथम अध्यक्ष रामचंद्र केरकर यांनी वर्षपद्धतीप्रमाणे सामूहिक गाऱ्हाणे घातले.  मंडळाचे अध्यक्ष संदीप वायंगणकर यांनी सर्वांचे आभार मानले. किनाऱ्यावर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com