Ganesh Festival 2021: मोर्ले सत्तरीत महिलांकडून केली जाते घुमट आरती

सत्तरीतील मोर्ले कासारवाडा येथील महिलांकडून गणपतीसमोर घुमट आरती केली जात आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने महिलांची या क्षेत्रात उतरल्या आहे.
Ganesh Festival 2021: मोर्ले सत्तरीत महिलांकडून केली जाते घुमट आरती
Ganesh Festival 2021: मोर्ले- कासारवाडा येथे गणपती समोर घुमट आरती करताना महिलाDainik Gomantak

पर्ये: गणेश चतुर्थीत (Ganesh Chaturthi) घुमट आरती (Ghumat Arti) ही पुरुषांची मक्तेदारी होती. पुरुषांनी आरत्या-भजने करणे तर महिलांनी फुगड्या- स्वयंपाक अशी कामे पारंपरिकरित्या (Traditionally) विभागली होती. पण यात आता कमालीचा बदल होताना दिसत असून सत्तरीतील मोर्ले कासारवाडा येथील महिलांकडून गणपतीसमोर घुमट आरती केली जात आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने महिलांची या क्षेत्रात उतरल्या आहे.

Ganesh Festival 2021: मोर्ले- कासारवाडा येथे गणपती समोर घुमट आरती करताना महिला
Goa: 'चवथी' निमित्त डिचोलीत फुलांना 'अच्छे दिन'

या वाड्यावरील काही शिक्षित मुलींनी घुमट आरती शिकण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपला गट तयार करून रितसरपणे घुमट आरती शिकून घेतल्या. यासाठी एका प्रशिक्षकाची नेमणूक करून आरत्या गायन, घुमट, समेळ, कासाळे वादन शिकून घेतल्या आणि आता या मुली/महिला चतुर्थीत आपल्या वाड्यावरील घरोघरी फिरून गणपती समोर आरत्या करीत आहेत. त्यामुळे त्यांची गावात चर्चा आहे.

मोर्ले- कासारवाडा येथे गणपती समोर घुमट आरती करताना महिला
मोर्ले- कासारवाडा येथे गणपती समोर घुमट आरती करताना महिलाDainik Gomantak

या महिलांनी घुमट आरती शिकल्यावर त्यांना गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात आरत्या करण्यासाठी आमंत्रणे आली होती तसेच इतर काही ठिकाणी त्यांनी आपल्या आरत्या सादर करून वाहवा मिळवली आहे.

या घमुट आरती करण्यासाठी दुर्वा गावकर, सुमिक्षा गावकर, स्वाती गावकर, अर्पिता गावकर, दिक्षिता गावकर, तन्वी गावकर, रेणुका गावकर, विनया गावकर, सुश्मिता गावकर, अमृते गावकर, सुलभा गावकर, सांवी गावकर आदींचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com