Ganesh Festival:बाप्पांची चाॅकलेटची मूर्ती साकारुन शिवानीने वेधले सर्वांचे लक्ष
चाॅकलेटची मुर्तीं Dainik Gomantak

Ganesh Festival:बाप्पांची चाॅकलेटची मूर्ती साकारुन शिवानीने वेधले सर्वांचे लक्ष

'१९३०' या मॉलमध्ये आवडीचा पदार्थ असलेल्या चॉकलेटपासून आबालवृद्धांच्या प्रदर्शनास ठेवण्यात आलेली ही गोडगोड मूर्ती भाविकांना आकर्षित करत आहे.

दाबोळी: गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने भाविक आपल्या कल्पकतेला वाव देत विविध वस्तूंपासून गणेशाची मूर्ती, प्रतीमा साकारतात आणि आपली भक्ती प्रकट करतात.त्याच अनुषंगाने पिशी डोंगरी वास्को येथील शिवानी राजेंद्र नाईक या तरुणीने सर्वांच्या लाडक्या बाप्पांची चाॅकलेटची मूर्ती (chocolate idol of Bappa) साकारुन सर्वांचे लक्ष वेधले. येथील '१९३०' या मॉलमध्ये आवडीचा पदार्थ असलेल्या चॉकलेटपासून आबालवृद्धांच्या प्रदर्शनास ठेवण्यात आलेली ही गोडगोड मूर्ती भाविकांना आकर्षित करत आहे.

चाॅकलेटची  मुर्तीं
Ganesh Festival 2021: मोर्ले सत्तरीत महिलांकडून केली जाते घुमट आरती
 शिवानी राजेंद्र नाईक आपल्या चाॅकलेटच्या मुर्तीं समवेत.
शिवानी राजेंद्र नाईक आपल्या चाॅकलेटच्या मुर्तीं समवेत.Dainik Gomantak

पिशवी डोंगरी येथे राहणाऱ्या शिवानीने बेकिंग सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २०१८ पासून चॉकलेटचा बाप्पा साकारण्याची तिची इच्छा होती. पण योग येत नव्हता. यंदा अगदी पहिल्याच प्रयत्नात योग जुळून आला आणि मनाजोगे सदर कलाकृती साकारली. आपल्या कल्पकतेच्या दृष्टीने विचार करून, चॉकलेटच्या गणपतीचा शोध लावणाऱ्या रितू राठोड यांच्यापासून प्रेरणा घेत मी गणेशाची मूर्ती साकारली. पहिल्याच प्रयत्नात यश आले, याचे समाधान वाटते अशी तिने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.येथील '१९३०' या मॉलमध्ये सदर मुर्ती प्रदर्शनास ठेवण्यात आली होती.या प्रदर्शनाचा लोकांनी लाभ घेतला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com