बाजार शिरोडा सार्वजनिक गणपतीचे विसर्जन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

कोरोना  कोविडच्या सावटामुळे सामाजिक अंतर ठेवून सर्व तऱ्हेच्या सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यांना फाटा देऊन हा उत्सव साजरा केला गेला. 

शिरोडा: बाजार शिरोडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५५ वा सार्वजनिक गणपती उत्सव या वर्षी दीड दिवस साजरा करण्यात आला. कोरोना  कोविडच्या सावटामुळे सामाजिक अंतर ठेवून सर्व तऱ्हेच्या सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यांना फाटा देऊन हा उत्सव साजरा केला गेला. 

शनिवार २२ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीचे पूजन, आरती, रविवार २३ रोजी पूजा, आरती, व संध्याकाळी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष शिरोडकर, प्रकाश नाईक, अमित शिरोडकर, शशिकांत फडके, आनंद खांडेपारकर, शिवानंद नाईक, सत्तेश शिरोडकर, उमेश नाईक, आदी मंडळी उपस्थित होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या