Goa: गणेशभक्ताला मिळाली गणपती सदृश्य आकाराची पपई

आपणाला साक्षात गणरायाचे दर्शन झाले. क्षणाचाही विलंब न करता आपण ती घरात पूजलेल्या गणपतीच्या चरणांकडे ठेवून तिला गंधफूल वाहिले.
Goa: गणेशभक्ताला मिळाली गणपती सदृश्य आकाराची पपई
Ganpati-shaped papayaDainik Gomantak

डिचोली: सुखकर्ता दुःखहर्ता मंगलमूर्तीचे घरोघरी आगमन झाल्याने गणेशभक्तांचा (Ganesh)उत्साह द्विगुणित झाला आहे. डिचोलीतील सर्वण येथील एका गणेशभक्ताला गणपतीसदृश्य आकाराची पपई (Papaya)मिळाली आहे. ऐन चतुर्थीच्या दिवशीच ही अनोखी पपई आढळून आल्याने गावात तो चर्चेचा मोठा विषय बनला आहे. ही गणरायाचीच कृपा असल्याची चर्चाही सुरु आहे.

Ganpati-shaped papaya
Goa: डिचोली लायन्स क्लबतर्फे सफाई कामगारांना चतुर्थीची भेट

सर्वण येथील एक गणेशभक्त सगुण (राजन) सावंत यांना त्यांच्या घराशेजारील पपईच्या झाडावर गणपतीच्या आकृतीसदृश्य ही आगळीवेगळी पपई आढळून आली आहे. ही नैसर्गिक किमया, की दैवी चमत्कार हा विषय बाजूला ठेवल्यास गणपतीसदृश्य पपई म्हणजे मंगलमूर्ती गणरायाची कृपा असल्याची भावना सगुण सावंत यांच्या कुटुंबियांमध्ये पसरली आहे. सगुण सावंत यांनी मोठ्या श्रद्धेने ही पपई घरी गणपतीच्या चरणापाशी ठेवून पपईचे भक्तीभावाने पुजन केले.

सगुण सावंत यांनी सांगितले की, आपणाला ही पपई जराशी वेगळी वाटली. म्हणून ती काळजीपूर्वक काढली. तेव्हा त्यात आपणाला साक्षात गणरायाचे दर्शन झाले. क्षणाचाही विलंब न करता आपण ती घरात पूजलेल्या गणपतीच्या चरणांकडे ठेवून तिला गंधफूल वाहिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com