गवताच्या फुलांपासून बनवला साडेचार फुट उंचीचा Ganesha
भुईपाल येथिल सुर्याकांत गावकर यांनी फुलांचा वापर करून साडेचार फुट बनवलेली गणेश मुर्ती बि डी मोटे

गवताच्या फुलांपासून बनवला साडेचार फुट उंचीचा Ganesha

भुईपाल येथिल सुर्याकांत गावकर गणेश चतुर्थीच्या काळात नवीन संकल्पना राबवतात. 4000 हजार फुलाचा वापर करून सुमारे साडेचार फुट गणेश मुर्ती उभारली

पिसुर्ले: सत्तरी तालुक्या बरोबर राज्यातील विविध भागात पर्यावरण जतनाचा संदेश देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विविध प्रकारच्या इकोफ्रेंडली (Ecofriendly) वस्तू बनवण्याचे धडे देणाऱ्या भुईपाल गावकर वाडा येथिल पर्यावरण वेड्या सुर्याकांत गावकर यांनी गणेश चतुर्थीच्या (Ganesh chaturthi) काळात आपल्या अंगणात सलग 15 वर्षे रानात मिळणाऱ्या नवीन नवीन प्रकारच्या वस्तूपासून गणेश मुर्ती उभारण्याची संकल्पना कायम ठेवली असुन, यंदा त्याच्यांने जंगल भागात उगवणाऱ्या एका विशिष्ठ प्रकारच्या गवतापासून मिळणाऱ्या फुलांचा वापर करून सुमारे साडेचार फुट गणेश मुर्ती (Ganesha idol) उभारून नागरिकांना प्रदर्शनासाठी उपलब्ध करून ठेवली आहे.

या विषयी माहिती देताना सुर्याकांत गावकर यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून म्हादई अभयारण्या बरोबर भुईपाल, सालेली गावातील जगंल भागात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांची फुले, फळे, वेली, तसेच गवत, तसेच नदी नाल्यातील नैसर्गिक वस्तू पासून गणेश मुर्ती बनवल्या आहेत, त्याच प्रमाणे यंदा सालेली व भुईपाल येथिल माळरानातून मिळालेल्या एका वैशिष्ट्य प्रकारच्या गवताच्या (भुतो) फुलांचा वापर करून सुमारे साडेचार फुट गणेश मुर्ती उभारण्यात आली आहे. यासाठी 15 दिवस खर्च करून सुमारे चार हजार फुलाचा वापर करण्यात आला आहे, सदर कामी घरातील सर्वांचे सहकार्य लाभले असल्याचे सुर्याकांत गावकर यांनी सांगितले.

भुईपाल येथिल सुर्याकांत गावकर यांनी फुलांचा वापर करून साडेचार फुट बनवलेली गणेश मुर्ती
Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग

सदर सुर्याकांत गावकर हे सलग 15 वर्षे विविध प्रकारच्या संकल्पने द्वारे गणेश मुर्ती उभारून इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देत आहे, त्याद्वारे पर्यावरणाचे रक्षण करणे कितके महत्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी ते आपला दैनंदिन जीवनातील कामकाज संभाळून अशा प्रकारे इतर युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहेत.

भुईपाल येथिल सुर्याकांत गावकर यांनी फुलांचा वापर करून साडेचार फुट बनवलेली गणेश मुर्ती
Ganesh Festival: पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग

अशा प्रकारे गणेश मुर्ती उभारून नागरिकांना प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देताना सुर्याकांत गावकर यांनी भुईपाल गावाचे नाव गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील काही भागात पोचवले असून, त्यामुळे या भागात सुर्याकांत गावकर यांनी बनवलेल्या गणेश मुर्ती पहाण्यासाठी सुमारे 21 दिवस या गावात गणेश भक्त तसेच पर्यावरण प्रेमींची वर्दळ सुरू असते, यंदाही सदर गणेश मुर्ती दर्शनासाठी 21 दिवस उपलब्ध असणार असल्याचे गावकर यांनी शेवटी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com