गणेशप्रिय फुले: कमळ

गणेशप्रिय फुले: कमळ
गणेशप्रिय फुले: कमळ

सर्वच तांबड्या रंगाची फुले श्री गणेशाला प्रिय आहेत. मात्र, त्यापैकी तांबड्या रंगाचे कमळ, झेंडूची फुले श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा आहे. झेंडूची केसरी रंगाची फुलेही श्री गणेशाला प्रिय आहेत. त्यामागे श्री गणेशाला प्रसन्न करणे हा भाव असतोच. मात्र, त्यानिमित्ताने त्या फुलांच्या औषधी गुणधर्माची उजळणी व्हावी हा स्वार्थही दडलेला असतो. 

गणपती विघ्नविनायक आहे. त्याचसाठी आरोग्यदायी असलेले कमळ मंगलमूर्तीला अर्पण करतात. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. त्याचे फुल, पाने, बिया, खोड व मूळ हे औषधी गुधर्मांनी परिपूर्ण आहे. फुलाचा उपयोग अतिरिक्त रक्तस्त्राव बंद करण्यासाठी करतात. लाल वर्णाचा तो गुणधर्म असावा. बियाचा उपयोग पचन प्रक्रियेत सुलभता येण्यासाठी करतात. अमांश, डायरिया या रोगांतही त्याची मात्रा घेतली जाते. कमळाच्या मुळी व्हिटामिन ब, क त्याचप्रमाणे लोह, तांबे झिंक पॉटेशियम यांनी समृद्ध असतात. कमळाच्या मुळीत रक्तशर्करा व कॉलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद आहे. बौद्ध व हिंदू धर्मात कमळ पुष्प शुद्धतेचे व पवित्रतेचे प्रतिक मानण्यात येते. 

जपानमध्ये या फुलांना, खोडाला व मुळींना जेवणातही स्थान आहे. फुलाना नारळ रसासारखा स्वाद येतो. कमळ पुष्पाच्या ट्युबरची स्लाईस करून त्याची भाजीही बनवण्यात येते व ती पोष्टीक आहे. त्याचप्रमाणे चहामध्ये कमळ पाकळ्या घालून चहाची लज्जत वाढवण्यात येते. गणेशाचे डोळे बारीक तीक्ष्ण नजरेचे, ती एकाग्रतेची व बुद्धीची देवता आहे. कमळ पुष्पाच्या बियात मन एकाग्र करण्याची शक्ती आहे. कमळाचा जन्म चिखलात होऊनही ते आपले मांगल्य अबाधीत राखते. ऋषीमुनींनी भगवंताच्या अवयवांची तुलना कमळाशी केली आहे. कमळपुष्प अनासक्तीचा, मांगल्याचा आदर्श आहे. आदर्श जीवनाचे दर्शन कमळ पुष्पांत होते.

goa
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com