गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या!

पणजीच्या फेरीबोटीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने विशेष लायटिंग मंडप उभारण्यात आला होता.
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या!
पुढच्या वर्षी लवकर या!Dainik Gomantak

पणजी: ‘गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे संगीताच्या तालात मिरवणुकीने मंगळवारी राज्यातील पाच दिवसांच्या गणपतींना विधिवत पूजा करून निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी वाड्यावरच्या एकत्र गणपतीची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. पणजीच्या फेरीबोटीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने विशेष लायटिंग (Lighting) मंडप उभारण्यात आला होता.

मिरामारच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन केले. यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने आणि राज्य सरकारने गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरे साजरा करण्याचे आवाहन केल्याने अनेक ठिकाणी काही कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. गणपती बरोबर गौरी पूजनाला मोठे महत्त्व असून अनेक ठिकाणी एकत्र पूजा करूनच एकत्र गौरी गणपती विसर्जन केले जाते.

पुढच्या वर्षी लवकर या!
Ganesh Festival 2021: गणेश चतुर्थीचे हे पाच दिवस गाळशिरेवासीयांसाठी खास आनंदाचे क्षण असतात

त्यामुळे पाच दिवसांच्या विसर्जनासाठी गर्दी होती. पणजी- बेती जलमार्गावरच्या फेरीबोटीच्या साहाय्याने मांडवी नदीच्या मध्यभागी नेऊन अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर मिरामार समुद्रकिनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गणपतींचे विसर्जन सुरू होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com