Goa: रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गणपती बाप्पाचा प्रवास खडतर

वास्को (Vasco) ठिकठिकाणी रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे यंदा गणपती बाप्पांना खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले.
Goa: रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गणपती बाप्पाचा प्रवास खडतर
Ganpati Bappa journey is difficult due to the bad condition of the road in goaDainik Gomantak

दाबोळी - वास्को (Vasco) ठिकठिकाणी रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे यंदा गणपती बाप्पांना खडतर प्रवासाला सामोरे जावे लागले. गणरायाला घरी आणताना तसेच विसर्जन स्थळी नेताना भक्तांना करावी लागली कसरत.तसेच वाहना बरोबर वाहनातून प्रवास करणाऱ्यांचीही झाली दुर्दशा.राज्यातील रस्त्यांची चाळण झाली असून चतुर्थीला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. तर आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणताना तसेच विसर्जनाला नेताना लोकांचे हाल झाले. कारण रस्त्याची परिस्थिती तशी झाली आहे.

वास्कोतही मुरगाव, वास्को, बायणा मांगूरहील, वाडे,मूंडवेल, चिखली, दाबोळी तसेच इतर अंतर्गत भागात रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्ते पावसाच्या पाण्याखाली गेल्याने रस्त्यावर पडलेला खड्ड्यांचा अंदाजा लागत नाही. त्यामुळे वाहन चालकांची हालत एकदम बेकार झाली आहे. कारण रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे गाड्यांची वाताहत होतेच, त्याचबरोबर चारचाकी, दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांची हालत एकदम बेकार होऊन जात आहे.

Ganpati Bappa journey is difficult due to the bad condition of the road in goa
गोव्यात Locked Houseचे सर्वाधीक प्रमाण

तो आपल्या घरी किंवा कामाला पोहोचेपर्यंत तसेच गाडीत बसलेल्यांची बकाल अवस्था होते. आपल्या लाडक्‍या गणरायाच्या पूजनासाठी लोकांचा आटापिटा चालतो त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरी, गावी जावे लागते. या खराब रस्त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचेही प्रकार वास्को व इतर ठिकाणी घडले आहे. तसेच दुचाकीचालक रस्त्यावर आडवे झालेले प्रकारातही वाढ झाली आहे.

दरम्यान रस्त्यांच्या झालेल्या दूरदर्शेमुळे यंदाच्या चतुर्थीत लाडक्या गणरायाला या खडतर मार्गातून आपला प्रवास करावा लागला. श्रींची मूर्ती घरी आणताना तसेच विसर्जन स्थळी नेताना भक्तांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. हे तेवढेच खरे आहे. खड्डेमय रस्तात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाजा लागत नाही. तसेच रस्त्यावर पडलेल्या पाण्याचे फवारे दुसऱ्या वाहनामुळे एकमेकावर पडतात.यामुळे चाकी चालकांची हालत बेकार होते.

या सर्व प्रकारामुळे लोकांनी आपली नाराजी मंत्र्यांच्या नावे बोटे मोडीत व्यक्त केली. तसेच काही ठिकाणी खोदकाम चालू आहे.खोदकामाची माती तशीच रस्त्यावर ठेवल्याने याचा वाहन चालका बरोबरच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.यंदाची ही चतुर्थी गणपती बाप्पा बरोबर लोकांचीही खडतर प्रवासात झाली. त्यामुळे लोकांनी या रस्त्याबाबत मंत्र्या विरोधी कडवट प्रतिक्रिया व्यक्त करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com