डिचोलीत गॅरेज जमीनदोस्त

bicholim
bicholim

डिचोली

तीन दिवस कहर केलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने उसंत घेतली असली, तरी आज (शुक्रवारी) सकाळी डिचोलीतील साष्टीवाडा - बोर्डे येथे एका गॅरेजवर भलामोठा जुनाट आम्रवृक्ष कोसळण्याची घटना घडली. गॅरेजजवळील एका घराला आणि तेथील एका दुकानालाही या पडझडीची झळ बसली. या घटनेत जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत गॅरेजची पूर्णपणे मोडतोड होऊन दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेली दुचाकीही झाडाखाली सापडली.
या घटनेत वित्तहानी वगळता सुदैवाने जीवितहानी झाली नाही. साष्टीवाडा-बोर्डे येथे मुख्य रस्त्याला टेकूनच असलेल्या श्री. गाड यांच्या गॅरेजवर हा भलामोठा आम्रवृक्ष कोसळला. आम्रवृक्षासह तेथीलच एक माडही कोसळला. त्यामुळे तेथीलच एका घराच्या आणि दुकानाच्या छपराची मोडतोड झाली. आम्रवृक्ष कोसळला त्यावेळी गॅरेजमध्ये कोणीही नव्हते. गॅरेजमध्ये चार ते पाच दुचाकी दुरुस्तीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. पैकी एक मोटारसायकल झाडाखाली सापडल्याने तिची मोडतोड झाली. डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच, दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे हवालदार एस. के. नाईक यांच्या नेतृत्वाखाली साईनाथ केसरकर, संदीप गावस, गीतेश, महेश नाईक आणि दलाच्या इतर जवानांनी मदतकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com